क्रिकेटमध्ये नेहमीच खेळाडूंची एकमेकांशी तुलना केली जाते. यात सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश आहे. त्याची आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना होते. त्यामुळे क्रिकेटमधील तज्ञांनी विराट कोहलीसारख्या दिग्गजाबरोबर त्याची तुलनाही केली आहे. आता बाबर आझमने स्वतः याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
माझी तुलना इतरांशी होऊ नये -बाबर आझम
एका यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबर आझम म्हणाला की, “शीर्ष क्रमांकाच्या फलंदाजांशी माझी तुलना केल्याचा आणि जगातील पहिल्या पाच फलंदाजांमध्ये समावेश केल्याचा मला अभिमान वाटतो. पण माझे स्वप्न आहे की एके दिवशी मीही अशा स्तरावर पोहचेल जेथे इतर फलंदाजांची तुलना माझ्याशी केली जावी आणि माझी तुलना इतरांशी होऊ नये.”
संघाला जिंकवून द्यायचे आहे सामने
पुढे बोलताना बाबर म्हणाला की, “प्रत्येक परिस्थितीत त्यांच्यासारखी कामगिरी करावी लागेल हेही मला ठाऊक आहे. त्याचबरोबर मला त्यांच्याशी स्पर्धा करावी लागेल. मलाही त्यांच्यासारखे प्रदर्शन करायचे आहे आणि संघाला सामने जिंकवून द्यायचे आहे.”
न्यूझीलंड दौऱ्यावर धावा करण्यास आतुर
26 वर्षीय बाबर परदेश दौऱ्यावरील कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला की, “परदेश दौर्यावर धावा केल्याने प्रचंड समाधान मिळते आणि म्हणूनच आगामी न्यूझीलंड दौर्यावर चांगली कामगिरी करण्यास मी आतुर आहे.”
परदेशात धावा केल्यास समाधान वाटते
“जेव्हा आपण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या ठिकाणी धावा करता, तेव्हा तुम्हाला समाधान मिळते आणि लोकही तुमच्या कामगिरीकडे लक्ष्य देतात. न्यूझीलंडविरुद्धची मालिका कठीण असेल, पण दोन कसोटी आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत मी धावा करण्यास उत्साही आहे,”असेही पुढे बोलताना बाबर म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयमुळेच झालं शक्य ! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले वनडे सामन्यांच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय
गोलंदाजांसाठी ‘ती’ बाब सोपी नाही, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरीनंतर अय्यरने केली पाठराखण






