---Advertisement---

आताची लहान पोरंही फाडफाड इंग्लिश बोलतात! तोडक्यामोडक्या इंग्रजीमुळे आझमचं होतंय हसू, तुम्हीही पाहा

Babar Azam English
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कट्टर प्रतिद्वंद्वी म्हटल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याची नेहमी सोशल मीडियावर चर्चा होत असते. कधी त्याच्या प्रदर्शनामुळे तर कधी इतर कारणामुळे तो चर्चेचा विषय बनत असतो. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केल्याने आझम चर्चेत आला होता. यानंतर आता तुटक्याफुटक्या इंग्रजी भाषेमुळे आझमचे सोशल मीडियावर हसू होत आहे. 

पाकिस्तानचा संघ सध्या नेदरलँड दौऱ्यावर (Pakistan Tour Of Netherland)आहे. या दौऱ्यातील दुसरा सामना गुरुवारी (१८ ऑगस्ट) खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड संघ ४४.१ षटकात १८६ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ३३.४ षटकातच ३ विकेट्सच्या नुकसानावर नेदरलँडचे आव्हान पूर्ण केले आणि ७ विकेट्सने सामना जिंकला. सलग दुसऱ्या विजयासह पाकिस्तानने ३ सामन्यांची वनडे मालिका २-० अशा फरकाने खिशातही घातली आहे.

हा सामना संपल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार आझम (Babar Azam) बक्षिस वितरण सोहळ्यात सहभागी झाला. यादरम्यान त्याला इंग्रजी भाषेत काही प्रश्न विचारले गेले, ज्याची त्यानेही इंग्रजी भाषेत उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची इंग्रजी चांगली नसल्याने तो बोलताना सतत अडखळत होता. यावरून क्रिकेटप्रेमी आझमची खिल्ली (Babar Azam English) उडवत आहेत. अनेकांनी वेगवेगळे मीम्स शेअर करत आझमची मजा घेतली आहे. तसेच काहींनी आझमचा बचावही केला आहे.

https://twitter.com/Muja_kyu_Nikala/status/1560618143445159945?s=20&t=aiv7sh1R8abNpZ71j7eslA

https://twitter.com/Musskkaan/status/1560647299155386368?s=20&t=sp8gmtgsJ5B-I0rGCmjgyw

महत्त्वाचे म्हणजे, आझम असा पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू नाही, ज्याला इंग्रजी भाषा बोलण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. माजी पाकिस्तानी कर्णधार इंजमाम-उल-हक, सरफराज अहमद यांसारख्या खेळाडूंचेही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही. याचमुळे बऱ्याचदा त्यांना ट्रोलही केले गेले आहे.

https://www.instagram.com/p/ChWytzrqvIe/?utm_source=ig_web_copy_link

पोट सुटत असल्याने आझम झालाय ट्रोल
दरम्यान पाकिस्तानचा स्टार फलंदाज आझम त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे ट्रोल झाला आहे. या फोटोंमध्ये त्याचे वाढलेले वजन आणि पोटामुळे लोक त्याला ट्रोल करत आहेत. सध्या पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम हा विराट कोहलीचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो. मात्र फिटनेसच्या बाबतीत कोहली आझमच्या खूप पुढे आहे. एकीकडे कोहलीला सिक्स पॅक आहेत. दुसरीकडे आझमचे पोट सुटत असल्याने त्याला ट्रोल केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

२८१ सामने खेळलेल्या भारतीय क्रिकेटरचा क्रिकेटला अलविदा! सप्टेंबर महिन्यात खेळणार शेवटचा सामना

मोईन अलीचा सीएसकेला दगा! दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळण्याचा घेतला निर्णय

कौतुक करावे तितके कमीच! झिम्बाब्वे बोर्डाने भारताविरुद्धची दुसरी वनडे ‘या’ लोकांना केलीय समर्पित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---