---Advertisement---

क्रिकेट जगतातून दिलिप कुमार यांना श्रद्धांजली; विराट, सचिनसह या खेळाडूंचे भावनिक ट्विट

On: बुधवार, जुलै 7, 2021 8:17 PM
---Advertisement---

बुधवारी (७ जुलै) सकाळी भारतीय सिनेसृष्टी व भारतीयांसाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली. भारतीय चित्रपटातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांचे मुंबई येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. अनेक दशके भारतीय चित्रपटसृष्टी व चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या दिलीप कुमार यांना सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. भारतीय क्रिकेटमधील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी देखील ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहून कुटुंबीयांचे सांत्वन केले.

अनेक वर्ष गाजवली चित्रपटसृष्टी
दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. आपल्या नैसर्गिक अभिनयामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या अफाट होती. भारतातील अनेक पिढ्या त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत. मात्र, मागील काही वर्षांपासून ते वृद्धापकाळामुळे सतत आजारी असत. मागील दोन महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. मुंबईतील प्रसिद्ध हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पत्नी सायरा बानो यादेखील आपल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

या भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
दिलीप कुमार यांना भारतीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. दिलीप कुमार हे क्रिकेटचे मोठे चाहते होते. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याने ट्विट करताना म्हटले, ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील आपले योगदान अतुलनीय आहे आणि आपली आठवण नेहमीच येत राहील. सायरा बानो जी आणि परिवाराबद्दल सांत्वना.’

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने देखील श्रद्धांजली वाहताना त्यांच्या चित्रपटातील एक संवाद लिहिला. भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त करताना श्रद्धांजली वाहिली. या व्यतिरिक्त भारताचा सलामीवीर व श्रीलंका दौऱ्यावर कर्णधार असलेला शिखर धवन याने देखील दिलीप कुमार यांना आदरांजली अर्पण केली. पाकिस्तानचा माजी कर्णधार व दिग्गज अष्टपैलू शाहिद आफ्रिदी यानेदेखील दिलीप कुमार यांच्या अभिनयाचे कौतुक करताना त्यांना श्रद्धांजली वाहिली.

https://twitter.com/DineshKarthik/status/1412661980226154498

क्रिकेट क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातूनही दिलिप कुमारांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

जीवनातील या ८ महत्त्वाच्या गोष्टी, ज्या धोनीकडून आहेत शिकण्यासारख्या

असे ५ गोलंदाज, ज्यांनी धोनीला करु दिल्या नाहीत शेवटच्या ओव्हरमध्ये धावा

आयपीएलमधील ‘हे’ ७ विक्रम आहेत केवळ एमएस धोनीच्याच नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---