भारत देश गेले दीड वर्ष कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटाने गेल्या महिन्याभरात धोक्याची परिसीमा गाठली आहे. रोज लोखोंनी रुग्ण या कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेली पाहायला मिळत आहेत. त्यातच ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ही परिस्थिती इतकी गंभीर होण्याच्या काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली होती. मात्र, आता हा हंगाम अनिश्चित काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटाचा फटका आयपीएलच्या १४ व्या हंगामालाही जोरदार बसला आहे. अनेक खेळाडू आणि संघाशी निगडीत अन्य सदस्य कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.
मंगळवारी (४ मे) सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज गोलंदाज अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तसेच त्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने संदिप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती हे खेळाडू तसेच चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस साफ करणारा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे संघांच्या बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने अखेर आयपीएलचा हा हंगाम अनिश्चित काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा निर्णय जाहीर करताना आयपीएलच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की ‘बीसीसीआय खेळाडूंच्या, सपोर्ट स्टाफच्या आणि आयपीएल आयोजनात सहभागी असलेल्या कोणाच्याही सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही.’
बीसीसीआयने हा निर्णय घेतल्यानंतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
माजी क्रिकेटपटू आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीनने म्हटले आहे की ‘भारतातील कोविड संकट पाहाचा आणि खेळाडू पॉझिटिव्ह सापडत असल्याने आयपीएल स्थगित करणे हा बीसीसीआय आणि आयपीएलचा योग्य निर्णय आहे. आशा आहे की आयपीएल चांगल्या आणि सुरक्षित वातावरणात पुन्हा होईल.’
https://twitter.com/azharflicks/status/1389511759053172739
तसेच डेल स्टेनने म्हटले आहे की ‘कोविड कोणाचीही पर्वा करत नाही. त्याचा कोणी आवडता नाही. जे आडारी आहेत, ते लवकर बरे व्हावे आणि आशा आहे की बारी सर्वजण घरी सुरक्षित राहातील आणि निरोगी आरोग्य त्यांना लाभेल.’
https://twitter.com/DaleSteyn62/status/1389500783146717184
त्याचबरोबर राजस्थानचा अष्टपैलू क्रिकेटपटू रियान परागने ‘खतम. बाय बाय.’ असे ट्विट केले आहे.
https://twitter.com/ParagRiyan/status/1389549322044383237
याबरोबर आणखीही काही क्रिकेटमधील प्रसिद्ध व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://twitter.com/KP24/status/1389501826148573184
https://twitter.com/MichaelVaughan/status/1389518140510543874
https://twitter.com/iamsidkaul/status/1389542155434201089
https://twitter.com/deepak_chahar9/status/1389463522753589252
https://twitter.com/gowthamyadav88/status/1389494742996619264
https://twitter.com/bhogleharsha/status/1389491891314429952
आता यानंतर बीसीसीआय आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामाबद्दल काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –






