---Advertisement---

‘कर्णधार’ धोनी युगाची अखेर! विराट, सेहवाग ते आयपीएल संघ, क्रिकेटविश्वातून अशा उमटल्यात प्रतिक्रिया

On: शुक्रवार, मार्च 25, 2022 4:25 PM
MS-Dhoni
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धेला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण, आयपीएलचा हा १५ वा हंगाम सुरु होण्याच्या २ दिवस आधीच दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने गुरुवारी (२४ मार्च) चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्त्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागेवर आता आयपीएल २०२२ मध्ये रविंद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे, तर धोनी केवळ खेळाडू म्हणून खेळेल. यामुळे चाहत्यांसह संपूर्ण क्रिकेटविश्वातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. तसेच धोनीच्या कर्णधार युगाचा अंत झाल्याच्या भावना अनेकांनी सोशल मीडियातून व्यक्त केल्या.

क्रिकेट विश्वातून उमटल्या प्रतिक्रिया
धोनीने (MS Dhoni) कर्णधारपद सोडल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर दोघांचा आयपीएलमधील फोटो पोस्ट केला. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पिवळ्या जर्सीतील एका उत्कृष्ट कर्णधाराचा कार्यकाळ संपला. एक असा अध्याय, जो चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. तुझ्यासाठी नेहमी आदर राहील.’ विशेष म्हणजे विराटने देखील या आयपीएल हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद सोडले आहे.

तसेच धोनीचा भारतीय संघातील आणि चेन्नई संघातील माजी संघसहकारी सुरेश रैनाने ट्वीट केले आहे की, ‘माझा भाऊ जडेजासाठी मला खूप आनंद झाला. आम्ही दोघेही ज्या फ्रँचायझीमध्ये खेळाडू म्हणून मोठे झालो, त्या फ्रँचायझीचे नेतृत्त्व सांभाळण्यासाठी मी जडेजाच्या नावापेक्षा अजून चांगल्या नावाचा विचार करू शकत नाही. हा एक रोमांचक टप्पा आहे आणि मला खात्री आहे की तू सर्व अपेक्षा पूर्ण करशील.’

याशिवाय इंग्लंडने माजी क्रिकेटपटू मायकल वॉन यांनीही जडेजा धोनीचा योग्य उत्तराधिकारी असल्याचे म्हणले आहे. त्यांनी लिहिले की, ‘धोनीचा उत्तराधिकारी म्हणून रॉकस्टारपेक्षा योग्य कोणी असू शकेल असे मला वाटत नाही.’ रॉकस्टार हे जडेजाच्या टोपन नावांपैकी एक नाव आहे. हे टोपन नाव त्याला शेन वॉर्नने दिले होते.

तसेच माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने बाहुबली चित्रपटातील एक सीन शेअर केला आहे. तसेच अन्य अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याशिवाय आयपीएलमध्ये सर्व संघांनी देखील धोनीचे कर्णधार म्हणून यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले असून जडेजाला शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनीची आयपीएल कारकिर्द 
धोनीने आयपीएलमध्ये २२० सामने खेळले आहेत. यात त्याने ३९.५५ च्या सरासरीने ४७४६ धावा केल्या असून २३ अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने यष्टीरक्षण करताना १६१ विकेट्स घेतल्या आहेत. धोनीने २०४ सामन्यात नेतृत्त्वही केले आहे. यातील १२१ सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच ८२ सामन्यात तो पराभूत झाला आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच २ चॅम्पियन्स लीग स्पर्धाही जिंकली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अगग! बड्डेला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा फक्त डक नव्हे तर डकचा नकोसा विश्वविक्रम, वाचा सविस्तर

नव्वदवर ८ विकेट्स, संकटात असलेल्या इंग्लंडचे गोलंदाज सॉलिड खेळले; फलकावर २०० धावा लावूनच गेले

चेन्नईचे नेतृत्त्व सोडणे धोनीचा ८ वा आश्चर्याचा धक्का! ‘या’ ७ प्रसंगीही माहीच्या निर्णयाने केलंय चकीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---