---Advertisement---

‘मी पावर हीटिंग करू शकत नाही’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्याआधी भारताच्या स्टार फलंदाजाचे मोठे वक्तव्य

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. या दोन संघात शुक्रवारी (27 नोव्हेंबर) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे खेळला जाईल. या मालिकेत चांगली कामगिरी करून भारतीय संघाला परदेशात विजय मिळवून देण्यास खेळाडू सज्ज आहेत. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलने त्याच्या योजनेबद्दल आणि काही खेळाडूंबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

मी माझ्या फलंदाजीला पावर हीटिंग म्हणणार नाही- केएल राहुल

स्वतःच्या फलंदाजीबद्दल बोलताना केएल राहुल म्हणाला की, “मी माझ्या फलंदाजीला पावर हीटिंग म्हणणार नाही. कारण प्रामाणिकपणे सांगायचं, तर मी ते करूच शकत नाही. माझ्याकडे फलंदाजीचे काही कौशल्ये आहेत आणि संघाच्या गरजेनुसार ही भूमिका निभावण्यावर मी विश्वास ठेवतो. मला 160 किंवा 170 च्या स्ट्राईक रेटने धावा करायच्या असतील, तर मी इतर मार्गाने ते करण्याचा प्रयत्न करेन.”

माझ्या भूमिकेबद्दल आनंदी

“मागील एक वर्षांपासून मी नियमितपणे वनडे सामने खेळत आहे. मी दीर्घकाळ सातत्याने क्रिकेट खेळलेलो नाही. मात्र, संघाच्या विजयात योगदान देत आहे आणि माझी भूमिका बजावत असल्याचा मला आनंद आहे,” असेही पुढे बोलताना राहुल म्हणाला.

मार्नस लॅब्यूशाने उत्तम खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा युवा प्रतिभावान फलंदाज मार्नस लॅब्यूशानेबद्दल बोलताना केएल राहुल म्हणाला की, “मला वाटत नाही की तो आता अज्ञात खेळाडू आहे. अव्वल पाच खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. गेल्या 12 महिन्यांपासून तो सातत्याने धावा फटकावत आहे. कोविड-19 मुळे मिळालेल्या विश्रांती आधीही तो सातत्याने चांगला खेळत होता. आशा आहे की तो भारतीय संघाविरुद्ध अधिक धावा करणार नाही. आमच्या संघात चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यामुळे त्याच्यासमोर कठीण आव्हान असेल.”

…म्हणून आम्ही ग्लेन मॅक्सवेलला पंजाब संघात दिले स्थान

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमधील संघ सहकारी ग्लेन मॅक्सवेलबद्दल बोलताना केएल राहुल म्हणाला की, “तो आक्रमक खेळाडू आहे आणि म्हणूनच आम्ही त्याला आयपीएलमध्ये आमच्या संघात स्थान दिलं होतं.”

वनडे मालिकेनंतर होईल टी20 आणि कसोटी मालिका

तीन वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. यानंतर दोन्ही संघांमध्ये 17 डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात कोलंबो किंग्ज-कँडी टस्कर्स आमने सामने, इरफानच्या कामगिरीवर लक्ष

ब्रेकिंग! न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचे ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

रहाणेने मागितली शेजाऱ्यांची माफी; धवन म्हणाला, ‘तू तुझ्या मुलीबरोबर…’

ट्रेंडिंग लेख-

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर

ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज

भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---