ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथची आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत गणना होते. तो कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे, असे भाष्य बऱ्याच दिग्गजांनी केले आहे. मात्र वनडे क्रिकेटमध्येही त्याने उत्तम कामगिरी केली आहे. परंतु वनडेत त्याची सरासरी कमी आहे. याच मुद्द्यावरून माजी भारतीय सलामीवीर विरेंद्र सेहवागने स्मिथची थट्टा केली होती. मात्र, त्यानंतर स्मिथने आपल्या शैलीत सेहवागला सडेतोड उत्तर दिले.
सेहवागने केली स्मिथची थट्टा
सेहवागने विनोदाने स्मिथची थट्टा करत म्हटले होते की, ‘माझा कसोटी क्रिकेटमधील स्ट्राइक रेट आणि स्मिथचा वनडे क्रिकेटमधील स्ट्राइक रेट जवळपास समान आहे.”
स्मिथने ठोकले वेगवान शतक
सेहवागने केलेले हे भाष्य कदाचित स्मिथच्या चाहत्यांना आवडले नसेल. परंतु, स्मिथने अवघ्या काही कालावधीतच आपल्या कामगिरीने सेहवागला उत्तर दिले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (27 नोव्हेंबर) पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात स्मिथने आपल्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक ठोकले. त्याने अवघ्या 62 चेंडूत शतक पूर्ण केले. एवढेच नव्हे, तर वनडेत वेगवान शतक ठोकणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
It's the third-fastest ton by an Aussie too! #AUSvIND pic.twitter.com/6yntvllbiF
— cricket.com.au (@cricketcomau) November 27, 2020
…म्हणून शतक होते खास
स्मिथचे हे शतक खुपच खास होते कारण तो 8 महिन्यांनंतर वनडे सामना खेळत होता.
या सामन्यात स्मिथने संथ गतीने सुरुवात केली.त्याने पहिल्या 20 चेंडूत 19 धावा फटकावल्या. पण त्यानंतर त्याने आक्रमक खेळी करत 36 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर पुढच्या 25 चेंडूत शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 4 षटकार लगावले आणि त्याचा स्ट्राइक रेट 159.09 होता.
दुसऱ्या वनडेतही शतक –
पहिल्या वनडेनंतर लगेचच 2 दिवसात स्मिथने सिडनी येथेच झालेल्या दुसऱ्या वनडेतही 62 चेंडूतच शतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात 64 चेंडूत 104 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईकरेट 162.50 इतका होता.
शतक ठोकून स्मिथने टीकाकारांना दिलं उत्तर
तो केवळ कसोटी क्रिकेटमध्येच नव्हे, तर वनडे क्रिकेटमध्येही उत्तम फलंदाजी करू शकतो हे स्मिथने वेगवान शतक ठोकून सिद्ध केले आहे. सिडनीमध्ये स्मिथने केलेली सलग 2 शतके त्याच्या टीकाकारांना मिळालेलं सडेतोड उत्तर आहे असं म्हणणे वावगं ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ तारखेपासून भारतात सुरु होणार देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा? बीसीसीआयने लिहिलेल्या पत्रात उल्लेख
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ दोन महत्त्वाचे शिलेदार तिसऱ्या वनडेतून आणि टी20 मालिकेतून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर राहुलकडून भारतीय गोलंदाजांची पाठराखण, फलंदाजांना दिला सल्ला