भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयवर विश्वास दाखवत त्यांच्या खराब कामगिरी नंतरही संघातून त्यांना वगळू नका असा सल्ला विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्रींना दिला आहे.
“सातत्याने अंतिम ११ खेळाडूंच्या संघात बदल केल्याने खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव येत आहे. या दबावातच त्यांची कामगिरी निराशजनक होत आहे. त्यामुळे मला वाटते की विराट आणि रवि शास्त्रींनी पहिल्या सामन्यातील संघच पुढील सामन्यासाठी खेळवावा.”
“मला वाटते की कोहलीने पुढील सामन्यात कोणताही बदल करु नये. कारण इंग्लंडमधील परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी फलंदाजांना वेळ लागतो. तसेच जर संघ व्यवस्थापनाने फलंदाजांशी बोलून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केल्यास ते नक्की चांगली कामगिरी करु शकतील.” असे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला.
भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाला समाधानकराक कामगिरी करता आली नाही.
त्यामुळे एजबस्टन कसोटीत भारताला ३१ धावांनी निसटता पराभव स्विकाराव लागला होता.
“पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत आता पहिला सामना झाला आहे. त्यामुळे मला वाटते की भारतीय फलंदाजांना आणखी संधी मिळाली पाहिजे. अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांनी यापूर्वी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ते उर्वरित मालिकेत दमदार पुनरागमन करतील.” असे मत गांगुलीने व्यक्त केले.
भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर ९ ऑगस्टपासून सुरु होत आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले