गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेळोवेळी अनेक बदल केले जात आहेत. या बदलांमुळे आणि नियमांमुळे खेळाडूंच्या खेळाचे तंत्रही बदलते. क्रिकेटमध्ये वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले जातात. मात्र, क्रिकेटच्या या खेळात असे काही नियम आहेत, जे कदाचित तुम्हाला माहितीही नसतील. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला क्रिकेटशी संबंधित काही रंजक नियमांबद्दल सांगणार आहोत. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
चेंडू हरवल्यानंतरचा नियम
क्रिकेटमध्ये चेंडू हरवल्याच्या बाबतीत अतिशय मनोरंजक नियम बनवले गेले आहेत. जर फलंदाजाच्या शॉटने चेंडू हरवला आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चेंडू हरवल्याची अपिल केल्याच तो चेंडू डेड बॉल घोषित केला जातो. अर्थात त्या चेंडूवर काढलेली धाव ग्राह्य धरली जात नाही.अशा परिस्थितीत दुसरा चेंडू आणून खेळ सुरू होतो.
अपील केल्याशिवाय बाद देता येत नाही
जोपर्यंत क्षेत्ररक्षक संघा अपील करत नाही तोपर्यंत फलंदाजाला अंपायर आऊट देऊ शकत नाही. अशा स्थितीत फलंदाज बाद झाल्यावर परत गेला तर अंपायर त्याला थांबवू शकतो आणि पुन्हा फलंदाजीला बोलावू शकतो. गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी रनअप घेईपर्यंत क्षेत्ररक्षण करणारा संघ गडी बाद झाल्याची अपील करू शकतो. त्यानंतर ती अपील ग्राह्य धरली जात नाही.
मँकाडिंगचा नियम
हा नियम सर्वप्रथम विनू मांकड यांनी वापरला.विनू मांकडने १९४७मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊनला बाद केले. यामध्ये, गोलंदाजीच्या टोकाला उभा असलेला फलंदाज क्रीझमधून बाहेर येतो, त्यानंतर गोलंदाज विकेटवर चेंडू मारून अपील करू शकतो. नियमांनुसार यामध्ये कोणतीही वॉर्निंग दिली जात नाही, परंतु नैतिकदृष्ट्या गोलंदाज यासाठी पहिल्यांदा फलंदाजाला इशारा देतात. त्यानंतरही फलंदाज बॉल टाकण्याआधी क्रिझच्या बाहेर गेल्यास त्याला बाद करू शकतो.
जखमी खेळाडूंसाठीचा नियम
जर एखादा जखमी खेळाडू पंचांना कळवल्यानंतर १५ मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिला तर तो तेवढा वेळ फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही. हा क्रिकेटमधील एक नियम आहे. ज्याच्यामुळे कोणता खेळाडू जखमेमुळे अंपायरला कळवल्यानंतर १५ मिनिटाच्या आत मैदानात परतणे आवश्यक असते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विदेशी खेळाडूंना का हवे आहेत त्यांच्या लीगमध्ये भारतीय खेळाडू? गावसकरांनी सांगितले कारण
आशिया चषकासाठी निवड न झाल्याने ईशान किशन नाराज! स्टोरी शेअर करत म्हणाला, ‘फायर…’
पाचव्या टी-२०त विश्रांती घेतल्यामुळे सूर्यकुमारला झटका! आयसीसी क्रमवारीत पॉईंट्सने केला घात