टीम इंडिया कानपूरमध्ये बांग्लादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात व्यस्त आहे. दुसरीकडे इराणी कप लखनऊमध्ये आज 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळवले जाणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा मुंबईत आयोजित केली जाणार होती. परंतु पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सामना लखनऊ हलवण्यात आला. या सामन्यात रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामातील विजेत्या मुंबईचा सामना उर्वरित भारताशी होणार आहे. मुंबईच्या संघात स्वत:च्या देशांतर्गत खेळाडूंचा समावेश आहे. तर उर्वरित भारतामध्ये विविध राज्यांतील बलाढ्य खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. अशा स्थितीत चाहत्यांना जबरदस्त सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
इराणी चषकात अनेक मोठी नावे खेळताना दिसणार असली तरी कानपूर कसोटीसाठी भारतीय संघात समाविष्ट केलेला फलंदाज सर्फराज खान, यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल आणि वेगवान गोलंदाज यश दयाल हे देखील निवडीसाठी उपलब्ध असतील. या तिन्ही खेळाडूंना बीसीसीआयने कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवसानंतर संघातून मोकळे केले. जेणेकरून ते इराणी चषकात आपापल्या संघांसाठी उपलब्ध राहतील.सर्फराजचा मुंबई संघात समावेश आहे. तर ध्रुव जुरेल आणि यश दयाल हे उर्वरित भारताचा भाग आहेत. या तीन खेळाडूंच्या आगमनाने त्यांचा संघ मजबूत होईल.
लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे असे. तर रेस्ट ऑफ इंडियाची कमान ऋतुराज गायकवाडकडे आहे. या दोन्ही संघांमधील सामना 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. टीव्हीवर त्याचे प्रसारण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर केले जाईल. तर ते जिओ सिनेमा ॲपवर देखील लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाईल. त्याचबरोबर जिओ सिनेमाच्या वेबसाइटवर ब्राउझरच्या माध्यमातून इराणी कपचा थेट आनंदही घेता येईल.
इराणी ट्रॉफीसाठी दोन्ही संघ
मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, हार्दिक तैमोर, सिद्धांत अधात्रो, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद खान, रोहित खान, मोहम्मद खान
उर्वरित भारताचा संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार, यश. दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर
हेही वाचा-
कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी षटकारांचा जोरदार पाऊस, टीम इंडियाने केला विश्वविक्रम
विराट कोहली 15 हजार ते 27000 पर्यंत नंबर वन; आणखी एक विश्वविक्रम नोंदवला
कसोटीमध्ये पहिल्या 2 चेंडूवर षटकार ठोकणारे फलंदाज