न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज मार्टीन गप्टीलने टी-20 क्रिकेटमधील 4 थे सर्वात जलद शतक केले आहे. सध्या मार्टीन गप्टील इंग्लंडमधील नेटवेस्ट टी-20 ब्लास्टमध्ये खेळत आहे.
मार्टीन गप्टीलने वूस्टरशायरकडून खेळताना शुक्रवारी (27 जुलै) नॉर्थहॅम्पटरशायर विरुद्ध झालेल्या सामन्यात 38 चेंडूत 102 धावांची वादळी खेळी केली.
यामध्ये गप्टीलने आपले शतक पूर्ण करायला फक्त 35 चेंडू घेतले. यामध्ये त्याने 12 चौकार आणि सात षटकार लगावले.
Incredible batting by @Martyguptill for @WorcsCCC!
He smashes a 35-ball 💯 – the joint-fourth fastest in T20 history
Watch every boundary: https://t.co/6e9L3hEVde pic.twitter.com/a13mMgC0z1
— Vitality Blast (@VitalityBlast) July 27, 2018
या शकतकाबरोबरच टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्यांच्या यादीत मार्टीन गप्टील आता संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहे.
यापूर्वी टी-20 मध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी वेस्ट इंडिजला ख्रिस गेल आहे. गेलने 2013 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरुद्ध 30 चेंडूत शतक केले होते.
तर दुसऱ्या स्थानी भारताचा युवा यष्टीरक्षरक फलंदाज ऋषभ पंत आहे. पंतने 2018 च्या मुश्ताक अली ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना हिमाचल प्रदेश विरुद्ध खेळताना 32 चेंडूत शतक लगावले होते.
यामध्ये ऑस्ट्रेलियाचा अॅंड्र्यू सायमंडने तिसरे स्थान पटकावले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 34 चेंडूत शतक केले आहे.
तर चौथ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा डेव्हीड मिलर आणि भारताचा रोहित शर्मा होते. आता या दोघांसह मार्टीन गप्टीलही संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहे.
डेव्हिड मिलरने बांगलादेश विरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते. तर रोहित शर्मानेही श्रीलंके विरुद्ध 35 चेंडूत शतक केले आहे.
या सामन्यात वूस्टरशायरने मार्टीन गप्टीलच्या शतकाच्या जोरावर नॉर्थहॅम्पटरशायरचे 188 धावांचे आव्हान 13.1 षटकात 1 गडी गमावून पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या-
-वाढदिवस विशेष- गॅरी सोबर्सबद्दल कधीही न ऐकलेल्या ५ गोष्टी
–“कैसे ना हो गुजारा, जब साथ हो कोहली और पुजारा” गब्बरच्या ट्विटने जिंकली लाखो चाहत्यांची मने