---Advertisement---

रणजीत 6000+ धावा अन् 400 विकेट्स घेणारा पहिलाच, तरी देखील टीम इंडियात संधी नाही

---Advertisement---

केरळचा स्टार अष्टपैलू जलाज सक्सेनाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. देशांतर्गत स्पर्धेतील दिग्गज खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या जलाज सक्सेना याने बुधवारी (दि. 6 नोव्हेंबर) रणजी ट्राॅफी स्पर्धेत ऐतिहासिक भरारी घेतली. रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात 6000 हून अधिक धावा आणि 400 हून अधिक विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. केरळ विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यातल्या सामन्यात जलाजने हा टप्पा ओलांडला.

जलजने वेगवान ऑफस्पिन चेंडूवर डावखुरा फलंदाज नितीश राणाची विकेट घेतली. या विकेटच्या जोरावर त्याने रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील 400 बळींचा आकडा गाठणारा 13वा गोलंदाज ठरला आहे. त्याचा 400 वा विकेट हा रणजी ट्रॉफीमधला 29 वा पाच विकेट हाॅल होता. अशा प्रकारे त्याने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली.

जलज सक्सेना गेल्या मोसमात दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला जेव्हा तो भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात 9000 धावा करणारा आणि सर्व फॉरमॅटमध्ये 600 बळी घेणारा केवळ चौथा खेळाडू बनला. या प्रकरणात त्यांनी विनू मंकड, मदन लाल आणि परवेझ रसूल यांच्या यादीत स्वत:चा समावेश केला आहे.

देशांतर्गत क्रिकेट गाजवूनही त्याला राष्ट्रीय संघात काही स्थान मिळालेले नाही. देशांतर्गत क्रिकेटच्या मागील पर्वात त्याने 9000 धावा आणि 600 विकेट्सचा टप्पा ओलांडला होता आणि असा पराक्रम करणारा तो विनू मांकड, मदन लाल व परवेझ रसूल यांच्यानंतरचा चौथा खेळाडू आहे.

हेही वाचा-

IND VS SA; ‘हॉटस्टार किंवा सोनी’वर नाही, या ठिकाणी पाहा लाइव्ह सामना
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकण्यासाठी ‘या’ माजी खेळाडूने दिला भारतीय संघाला सल्ला
IPL Mega Auction; मेगा लिलावात अनसोल्ड ठरू शकतो इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---