भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 साठी अमेरिकेला गेला आहे. टीम इंडीया तेथे चांगली तयारीही करत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने टीम इंडियाचा प्लेईंग इलेव्हन बनवला आहे, जे की खूपच आश्चर्यकारक आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सर्वात धक्कादायक निर्णय रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडनने पुन्हा एकदा विराट कोहलीला सलामी देण्याचा आग्रह धरला आहे. जर कोहली सलामी देत नसेल तर त्याला संघात स्थान मिळू नये, असे हेडनने म्हटले आहे. हेडनने ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, “तुमच्याकडे डावखुरा आणि उजव्या हाताच्या फलंदाजांचे संयोजन असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे सलग पाच उजव्या हाताचे फलंदाज असू शकत नाहीत. कोहलीला सलामी द्यावी लागेल किंवा तो माझ्या संघात खेळणार नाही. कोहली शानदार आहे. या कालावधीत ” तो फॉर्ममध्ये आहे आणि तो सामन्यााची सुरुवात करायला पाहिजे.”
हेडनने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोहली आणि जयस्वाल यांचा सलामीवीर म्हणून समावेश केला आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आणि रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. रिषभ पंत पाचव्या, हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर आहे. हेडनने शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचाही आपल्या संघात समावेश केला आहे.
भारताने आपल्या एकमेव सराव सामन्यात बांग्लादेशला 60 धावांनी मात दिला होता. रिषभ पंतने विस्फोटक अर्धशतकी खेळी खेळली होती. गोलंदाजीत आर्शदीप सिंग आणि शिवम दुबेने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. या उतकृष्ट कामगिरीचा फायदा टीम इंडीयाला नक्कीच होणार आहे. टीम इंडीया 5 जून पासून आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिला सामना आर्यलँड विरुद्ध तर 9 जून रोजी मारत पाकिस्तान याच्यांत सामना रंगणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
केदार जाधवने एमएस धोनीच्या शैलीत घेतली क्रिकेट मधून निवृत्ती! इंस्टारग्रामवर शेअर केला व्हिडिओ
मराठमोळ्या केदार जाधवची पाहा कशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द
रोहित शर्माला ‘या’ दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी!