बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तंदुरुस्त झाला असून मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास वर्षभरानंतर तो सामने खेळताना दिसणार आहे. त्याने 19 नोव्हेंबर 2023 रोजी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. मात्र, आता त्याला रणजी ट्रॉफीमध्ये संधी मिळणार असून (बुधवारी 13 नोव्हेंबरला) तो मैदानात दिसणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली आहे.
मोहम्मद शमी बुधवारपासून मध्य प्रदेश विरुद्धच्या रणजी ट्रॉफी एलिट ग्रुप सी सामन्यात इंदूरच्या मैदानावर गोलंदाजी करताना दिसणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट आणि बंगाल रणजी ट्रॉफीसाठी ही चांगली गोष्ट आहे की मोहम्मद शमी पुनरागमन करणार आहे. तो बुधवारपासून इंदूरमध्ये यजमान मध्य प्रदेशविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी सामन्यात खेळणार आहे. शमी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळणारा तो मध्य प्रदेशविरुद्ध संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल.
MOHAMMAD SHAMI IS BACK…!!!!
– Shami will be playing for Bengal tomorrow in Ranji Trophy. [RevSportz]
Great news for Team India ahead of Border Gavaskar Trophy & Champions Trophy. pic.twitter.com/XIpB0gDtf7
— Johns. (@CricCrazyJohns) November 12, 2024
बंगाल क्रिकेट असोसिएशनने पुढे सांगितले की, “बंगाल संघात शमीचा समावेश करणे संघासाठी खूप फायदेशीर ठरेल. बंगाल संघ रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.” बंगालचा संघ सध्या चार सामन्यांनंतर 8 गुण मिळवून आपल्या गटात पाचव्या स्थानावर आहे. शमीला फिटनेस सिद्ध करण्याची संधी आहे. अश्या स्थितीत तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी संघात त्याची निवड होऊ शकते. सलग दोन रणजी सामने खेळून आणि दीर्घ स्पेल टाकून त्याने फिटनेस आणि कामाचा ताण सांभाळला तर तो ऑस्ट्रेलियातही शेवटचे तीन सामने खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा-
“सीएसके माझ्यासाठी बोली…”, मेगा लिलावापूर्वी चेन्नईच्या स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य
IPL 2025; जोस बटलर-मिचेल स्टार्क नाही, हा परदेशी खेळाडू मेगा लिलावात खळबळ माजवणार!
सूर्यकुमार यादवचे मोठे वक्तव्य, पाकिस्तानमध्ये न जाण्याचे कारण सांगितले, पाहा VIDEO