टी20 विश्वचषक जिंकताच टीम इंडियावर पैशांचा वर्षाव झाला आहे. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूंना मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. अहवालानुसार भारतीय संघाला जवळपास 145 कोटी 40 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. (20.4 कोटी विजेतेपदाचे आणि 125 कोटी बीसीसीआयने जाहीर केलेले) तर जाणून घ्या या रकमेची विभागणी कशी होणार आहे.
भारतीय संघतील खेळाडूंना 125 कोटींमधून प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी कमीत कमी 5 कोटी, सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 1 कोटी तर निवड समिती सदस्यांना प्रत्येकी 50 लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच संघातील प्रत्येक खेळाडूला 5 कोटी, तर 15 सदस्यांचा सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 1 कोटी तर, निवड समितीमधील 5 सदस्यांना 50 लाख रुपये मिळणार आहेत. भारतीय संघात एकूण 15 खेळाडू, 15 सदस्यांचा सपोर्ट स्टाफ आणि 5 निवड समिती सदस्य आहेत.
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आधीच पोस्ट करत भारतीय संघ 125 कोटी रुपयांचें बक्षीस जाहीर केले होते. त्यांनी पोस्ट मध्ये लिहले होते की, “टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना आनंद होत आहे. संघानं संपूर्ण स्पर्धेत दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन केलं. या अद्भुत कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन.” या व्यतिरिक्त आयसीसीकडून विजेतेपदाचे 20.4 कोटी रुपये असे एकूण 145 कोटी 40 लाखांचे बक्षीस भारतीय संघास मिळणार आहे.
2024 टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे होता –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
रोहित शर्माच्या नेतृत्वाखील भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाचा खिताब जिंकला आहे. 2007 साली एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ टी20 विश्वचषकच्या पहिल्या आवृत्तीत खिताब जिंकला होता. तब्बल 17 वर्षानंतर पुन्हा एकदा रोहित शर्माने हा किर्तीमान रचला आहे.
महत्तवाच्या बातम्या-
भारतीय संघात पदार्पणासाठी आयपीएल स्टार्स सज्ज, आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना
रोहित शर्मानंतर टी20 मध्ये भारताचा कर्णधार कोण होणार? जय शाह यांचं मोठं वक्तव्य
चक्रीवादळाचं संकट आणखी गडद, टीम इंडिया बार्बाडोसमध्येच अडकली; भारतात कधी परतणार?