टी20 विश्वचषक 2024 मधील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी होणार आहे. भारतीय वेळेनूसार हा सामना रविवारी रात्री 8 वाजता सुरु होईल. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू मैदानात खूप मेहनत करत आहेत. सामन्याच्या एक दिवस आदी भारताकडून विराट कोहली कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांनी नेट्स मध्ये तासंतास सराव केली. आयर्लंड विरुद्ध 5 चेंडूत 1 धाव करणारा कोहली दोनदा सराव केला. न्यूयॉर्कची ‘असमतोल उसळी’ खेळपट्टी आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाजी लक्षात घेऊन, सहा सराव खेळपट्ट्यांपैकी तीन खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांनी सराव केला.
थ्रोडाऊनमुळे रोहितच्या अंगठ्याला मार लागला, तरीही तो इतर भारतीय फलंदाजांसोबत नेटमध्ये अतिरिक्त सराव केला. जेणेकरून नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या अव्हानांत्मक खेळपट्टीवर ते पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतील. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात आयर्लंडला 96 धावांत गुंडाळले होते. पण शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, हरिस रौफ आणि नसीम शाह यांचे आव्हान पूर्णपणे वेगळे असेल हे भारतीय फलंदाजांना चांगलेच माहीती आहे.
नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या ‘ड्रॉप इन’ खेळपट्टीवर त्याच्या असमान उसळीमुळे खूप टीका झाली आहे. अश्या स्थितीतही आव्हानात्मक खेळपट्टीवर भारतीय फलंदाजानी तीन तास सराव केला आहे, नेट्स मध्ये ते जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज आर्शदीप सिंग यांच्या चेंडूचा सामना केला. यासोबतच फिरकीपटू कूलदीप यादवही गोलंदाजी करताना पहायला मिळाला. अश्या परिस्थितीत टीम इंडिया कोणत्या टीम काॅम्बिनेशनसह मैदानात उतरणार हे पाहणे योग्य राहील.
पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.