आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नाही आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) श्रीलंका किंवा दुबईमध्ये सामने आयोजित करण्याची विनंती केली आहे. 2008 च्या आशिया कप पासून भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमुळे टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये कोणतीही क्रिकेट स्पर्धा खेळलेली नाही.
भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात न जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुरक्षेचा प्रश्न. यापूर्वीही पाकिस्तानमध्ये भारतीय क्रिकेटपटूंवर हल्ले झाले असताना असे अनेक वाद झाले आहेत. 1989 मध्ये कराची येथे झालेल्या कसोटी सामन्यात तत्कालीन भारतीय कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांतवर पाकिस्तानी प्रेक्षकांनी हल्ला केला होता. हा तोच कसोटी सामना होता ज्यामध्ये 16 वर्षीय सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
1989 :: Pakistani Citizen Attacks Indian Captain Srikant During India Pakistan Cricket Match In Karachi , Pakistan pic.twitter.com/MXg6FI7nsV
— indianhistorypics (@IndiaHistorypic) July 11, 2024
या कसोटी सामन्यादरम्यान पाकिस्तानातील काही आंदोलक मैदानाच्या मध्यभागी आले आणि त्यांनी कृष्णमाचारी श्रीकांत यांच्यावर हल्ला केला. सामन्यादरम्यान एक पाकिस्तानी प्रेक्षक खेळपट्टीवर आला आणि त्याने भारतीय क्षेत्ररक्षकांना धमकावण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांतने मध्यस्थी केली, पण त्याचा विपरीत परिणाम झाला. त्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षकाने धक्काबुक्की करत श्रीकांतला मारहाण केली. या घटनेवेळी माजी कर्णधार कपिल देवही मैदानावर उपस्थित होते.
तत्कालीन संघ व्यवस्थापक चंदू बोर्डे यांनीही ही घटना उघड केली आहे. मोहम्मद अझरुद्दीनवरही पाकिस्तानात धातूच्या हुकने हल्ला करण्यात आल्याचा खुलासा चंदू बोर्डे यांनी केला होता. अशाप्रकारे सर्व प्रकारच्या वादांना तोंड देत टीम इंडियाचे खेळाडू भारतात परतले. डिसेंबर 2012 ते जानेवारी 2013 दरम्यान भारतात झालेली द्विपक्षीय मालिका ही भारत आणि पाकिस्तानमधील शेवटची द्विपक्षीय मालिका होती. तेव्हापासून हे दोन्ही देश केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच आमनेसामने आले आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
हे काय, कार्यकाळ सुरु होण्यापूर्वीच बिनसलं? बीसीसीआयने हेड कोच गंभीरच्या दोन्ही अटी फेटाळल्या
आग, आक्रमकता आणि प्रेम…, गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या ‘डीजे’ने काय म्हटले?
ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये फूट? मिचेल स्टार्कची नाराजी; अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाशी संबंधित प्रकरण