भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबर रोजी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे खेळाडू नेटमध्ये कसून सराव करत आहेत. मात्र सरावादरम्यान खेळाडू मजा- मस्तीही करताना दिसत आहेत. काही भारतीय खेळाडूंचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते एकमेकांच्या गोलंदाजी शैलीची नक्कल करताना दिसत आहेत.
खेळाडू मैदानावर करत आहेत परिश्रम
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची तयारी म्हणून संघातील खेळाडू मैदानावर कठोर परिश्रम घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने काही भारतीय खेळाडूंचे व्हिडिओ शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये ते नेटमध्ये सराव सराव करताना दिसले होते.
बुमराहने केली जडेजाच्या गोलंदाजीची नक्कल
नुकताच बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये फिरकीपटू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि युवा भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये जडेजाने प्रथम बुमराहच्या गोलंदाजी शैलीची नक्कल केली. त्याने डाव्या हाताने बुमराहच्या शैलीत गोलंदाजी केली. यानंतर पृथ्वी शॉ महान फिरकीपटू अनिल कुंबळेच्या शैलीत गोलंदाजी करताना दिसला. त्यानंतर बुमराह गोलंदाजी करायला आला. बुमराहने जडेजाच्या शैलीत फिरकी गोलंदाजी केली. बुमराहने जडेजाच्या गोलंदाजी शैलीची अचूकपणे नक्कल केली. त्याने डाव्या हाताने चेंडू अचूक टप्प्यावर फेकला.
Whose bowling actions are @Jaspritbumrah93, @imjadeja and @PrithviShaw imitating? 🤔😀 #TeamIndia pic.twitter.com/JvvPXtgbhv
— BCCI (@BCCI) November 25, 2020
पृथ्वी शॉ आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु त्याने गोलंदाजीतही आपला हात आजमावला. जसप्रीत बुमराह आणि मुथय्या मुरलीधरन यांच्याशिवाय अनिल कुंबळेच्या गोलंदाजी शैलीत शॉने गोलंदाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्याला बाद करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील”, दिग्गजाचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घरचा आहेर
“मी देशासाठी काय केले हे जगाला माहीत आहे”, मलिंगा झाला भावूक
“आमचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार” ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने फुंकले रणशिंग
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज