‘कसोटी क्रिकेट’ हा क्रिकेटमधील महत्वाच्या प्रकारांपैकी एक. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूचा खरा कस लागतो. प्रत्येक खेळाडूचे एक स्वप्न असते की, आपण आपल्या देशाचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करावे. खूपवेळा खेळाडू एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात आपल्या देशासाठी खेळतात. पण प्रत्येकाचे कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईलच असे नाही. भारतीय संघाचा असाच एक खेळाडू आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु अद्याप त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.
सध्या भारतीय संघाकडे युवा फिरकीपटूंचा भरणा आहे. त्यापैकीच एक असलेला फिरकीपटू राहुल चाहर आईपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. याच चाहरला लहानपणापासून भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळायचे आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारा राहुलला भारतीय कसोटी संघात अजूनही स्थान मिळालेले नाही.
राहुलने इंडिया टीव्हीच्या मुलाखतीत सांगितले कि, “मला भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळायचे आहेत. कारण, हे माझ स्वप्न आहे, जे मी ८ वर्षांचा होतो तेव्हापासून बघितले होते. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत मी हे स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो. परंतु, मी त्या सामन्यात राखीव खेळाडू म्हणून राहिलो. मी या गोष्टीच्या खूपच जवळ आहे आणि मला हे स्वप्न साध्य करण्यास अजून मेहनत घ्यावी लागणार आहे”.
साल २०२०-२१ मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात राहुल चाहरची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. परंतु, त्याला संधी न मिळता पहिल्या कसोटीत शाहबाज नदीमला संधी देण्यात आली. त्यानंतर पूर्ण मालिकेत अक्षर पटेलला संधी मिळाली. त्यामुळे राहुल चाहर जवळ येऊन सुद्धा कसोटी संघात पदार्पण करण्यापासून वंचित राहिला. तरीही राहुलला अजून विश्वास आहे की, येत्या काळात तो भारतीय संघासाठी कसोटी सामना नक्की खेळेल.
राहुलने आईपीएल सामन्यांत जोरदार प्रदर्शन केले आहे. राहुल सध्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळताना गेल्या २-३ वर्षात त्याच्या गोलंदाजीत बहार आली असून त्याने भारतीय टी-२० संघात आपले स्थान पक्के केले आहे. आईपीएल २०२१च्या २९ सामन्यांनपर्यंत राहुल सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिल्या ५ मध्ये आहे. राहुलने आजवर भारतीय संघासाठी ३ टी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने ३ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दर आठवडल्याला २०७ किमीचा प्रवास, गुरुद्वाऱ्यातील लँगरवर भागवायचा भूक; आता आहे ‘भारताचा स्टार फलंदाज’
गावसकरांमागची ७ जूनची साडेसाती; आजच्याच दिवशी १७४ चेंडूंमध्ये केल्या होत्या फक्त ३६ धावा
बांगलादेशी खेळाडूची बालिश चूक, चेंडू पकडण्याच्या नादात विसरला बाउंड्री अन् स्वत:चं केलं हसू