---Advertisement---

बापरे! मुंबई विरुद्ध कर्नाटक रणजी सामन्यात पकडण्यात आले चक्क दोन साप

On: रविवार, जानेवारी 5, 2020 4:50 PM
---Advertisement---

भारतात सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत चौथ्या फेरीत मुंबईचा सामना कर्नाटक विरुद्ध झाला. या सामन्यादरम्यान आज(5 जानेवारी) तिसऱ्या दिवशी दोन साप पकडण्यात आले.

हा सामना मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये पार पडला. या सामन्यादरम्यान एक नाही तर दोन साप दिसले. त्यामुळे अखेर सर्पमित्रांची मदत घ्यावी लागली. सर्पमित्राने हे दोन्ही साप पकडले.

या सामन्यादरम्यान दुसऱ्या दिवशीही साप दिसल्याचा काही लोकांनी दावा केला होता.

या सामन्यात कर्नाटकने आज 5 विकेट्सने विजय मिळवला. कर्नाटकसाठी हा विजय खास ठरला कारण हा त्यांचा 200 वा रणजी विजय आहे.

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली होती. मात्र त्यांचा पहिला डाव 194 धावांवरच संपुष्टात आला होता. त्यानंतर कर्नाटकचा पहिला डाव 218 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे कर्नाटकने 24 धावांची आघाडी घेतली आहे.

मात्र यानंतर पहिल्या डावापेक्षाही दुसऱ्या डावात मुंबईची कामगिरी खराब झाली. त्यांनी दुसऱ्या डावात केवळ 149 धावा केल्या. त्यामुळे कर्नाटकला विजयासाठी केवळ 126 धावांची गरज होती. या धावा त्यांनी 24.3 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करुन सामना आपल्या नावावर केला.

रणजी ट्रॉफी 2019-20 च्या पहिल्याच दिवशीही मैदानात दिसला होता साप – 

रणजी ट्रॉफी 2019-20 चा मोसम 9 डिसेंबरपासून सुरु झाला. या मोसमाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ विरुद्ध आंध्रप्रदेश सामन्यात सुरुवातीलाच सापामुळे व्यत्यय आला होता.

विजयवाडा येथे झालेल्या या सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात आले. परंतू सामन्यातील पहिला चेंडू पडण्याआधीच मैदानात सापाने हजेरी लावली. या सापाला बाहेर काढण्यासाठी ग्राउंड स्टाफने प्रयत्न केले. अखेर सापाला बाहेर काढल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---