इंडियन प्रीमियर लीग 2020 चा अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना मुंबईने एकहाती जिंकला. या विजयासह मुंबईने आयपीएल इतिहासात पाचवा किताब पटकावला. हे पाचही किताब मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने मुंबईच्या कर्णधारपदाबाबत एक भविष्यवाणी केली आहे.
सूर्यकुमार होऊ शकतो मुंबईचा कर्णधार
ईएसपीएन क्रिकइंफो या वेबसाईटच्या प्रतिनिधीशी केलेल्या खास संभाषणात गौतम गंभीर म्हणाला की, “सूर्यकुमार यादवला एक चांगला फलंदाज म्हणून लोक ओळखतात. पण या खेळाडूतही नेतृत्व क्षमता आहे. त्याची बुद्धी तल्लख आहे आणि संघाचे नेतृत्व कसे करायचे हे त्याला माहित आहे. रोहित शर्मा हा एक अतिशय यशस्वी कर्णधार आहे. पण जर तो मुंबई इंडियन्सच्या संघात राहिला तर, भविष्यात या संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे जाऊ शकते.”
रणजी संघाचे करतो नेतृत्व
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सूर्यकुमार यादव हा मुंबई रणजी संघाचा कर्णधारही आहे. सन 2014-15 या कालावधीत त्याने मुंबईचे कर्णधारपद सोडले पण सन 2019 मध्ये त्याला पुन्हा कर्णधारपद देण्यात आले. सूर्यकुमार यादव सर्वात आधी संघाचा विचार करतो.
….म्हणून तो कर्णधार बनू शकतो- गौतम गंभीर
गौतम गंभीरने सांगितले की, “कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळत असताना तो कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार असायचा. या बलिदानामुळे तो एक मोठा खेळाडू आणि भविष्यातील कर्णधार बनू शकतो.
सूर्यकुमारची आयपीएल 2020 मधील कामगिरी
आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात सूर्यकुमारने रोहित शर्मासाठी स्वतःची विकेट गमावली. या हंगामात त्याने 40 च्या सरासरीने 480 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-सूर्यकुमार यादवच्या ‘या’ पराक्रमाने तरी निवड समितीचे डोळे उघडतील का?
-दिग्गजाने निवडला सर्वोत्कृष्ट आयपीएल संघ; विराटला डच्चू तर सूर्यकुमार यादवला दिले ‘हे’ स्थान
-“सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या फ्लाइटमध्ये असायला हवे”
ट्रेंडिंग लेख-
-मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी
-गोलंदाजीचे शेर! आयपीएलच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारे ३ गोलंदाज






