भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे खेळला जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. दीर्घ काळानंतर पुनरागमन करणारा मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तसेच, रहाणेचे संघात असणे हे भारतासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. यामागील कारण म्हणजे, वेस्ट इंडिजविरुद्धच्या धरतीवरील त्याची अफलातून कामगिरी होय.
रहाणेची वेस्ट इंडिजमधील कामगिरी
अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिज (Ajinkya Rahane West Indies) संघाविरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामने खेळताना नेहमीच यजमानांना नडला आहे. त्याने इथे कसोटी सामन्यात 102.80च्या सरासरीने धावा केल्या आहेत. रहाणेने वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत 6 सामन्यांतील 8 कसोटी डावांमध्ये फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 102.80च्या सरासरीने तब्बल 514 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 2 शतके आणि 3 अर्धशतकांचाही पाऊस पाडला आहे. वेस्ट इंडिजमध्ये फलंदाजी करताना नाबाद 108 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. विशेष म्हणजे, रहाणे हा सक्रिय भारतीय खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन
अजिंक्य रहाणे दीर्घ काळापासून भारतीय कसोटी संघातून बाहेर होता. यावर्षी खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात तो चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून खेळताना दिसला होता. चेन्नईकडून खेळताना त्याने शानदार प्रदर्शन केले. रहाणेच्या या फॉर्मने पुन्हा एकदा त्याचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन करून दिले.
नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रहाणेने 18 महिन्यांनंतर संघात पुनरागमन केले. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात त्याने चमकदार कामगिरीही केली. त्याने दोन्ही डावात मिळून 67.50च्या सरासरीने 135 धावा केल्या होत्या. त्याचे हे प्रदर्शन पाहून पुन्हा एकदा त्याच्याकडे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतही रहाणे भारतीय संघाचा उपकर्णधार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट आणि नवदीप सैनी. (cricketer ajinkya rahane batting performance in west indies with average of more than 102 read here)
महत्वाच्या बातम्या-
‘बिल्कुल नाही, ऑस्ट्रेलियाला या पराभवाचा…’, इंग्लंडविरुद्ध हारताच कमिन्सचे मोठे विधान, लगेच वाचा
तिसऱ्या कसोटीत कांगारूंची पिसे काढणाऱ्या खेळाडूवर स्टोक्स फिदा; म्हणाला, ‘अशा खेळाडूमुळेच मजबूती…’