इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या ऍशेस 2023 मालिकेतून मोठी बातमी समोर येत आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटीत जॉनी बेअरस्टो याच्या वादग्रस्त पद्धतीने बाद होण्यासाठी इंग्लंडच्या माध्यमांमध्ये व्हिलन ठरलेला ऍलेक्स कॅरे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी त्याच्या चर्चेत येण्यामागील कारण जरा वेगळे आहे. खरं तर, लीड्स येथील एका न्हाव्याने आरोप लावला आहे की, ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाजाने त्याच्या दुकानात केस कापले, पण पैसेच दिले नाहीत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, लीड्समधील डॉक बार्नेट (Doc Barnet Barber Shop Leeds) नावाच्या दुकानात ऍलेक्स कॅरे (Alex Carey) याने केस कापले होते. त्याच्यासोबत डेविड वॉर्नर (David Warner) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) हेदेखील त्याच दुकानात गेले होते. या दोघांनीही फोटो काढून हेअरकटचे पैसेही दिले. मात्र, कॅरेने फोटो काढण्यास नकार दिला आणि पैसे न देताच निघून गेला.
ऍलेक्स कॅरेने दिले नाहीत 30 पाऊंड
डॉक बार्नेट नावाच्या दुकानातील न्हावी ऍडम महमूद (Adam Mahmood) याने म्हटले की, ऍलेक्स कॅरे याच्याकडे रोख रक्कम नव्हती आणि दुकानात कार्ड स्वीकारले जात नाही. त्यामुळे कॅरेने न्हाव्याला म्हटले की, तो पैसे ट्रान्सफर करेल. मात्र, कॅरेने अद्याप 30 पाऊंड ट्रान्सफर केले नाहीयेत. भारतीय चलनानुसार ही रक्कम 3000 पेक्षाही जास्त आहे.
Alex Carey has not yet paid the UK barber the £30 for a haircut. Barber Adam has given him the deadline of Monday. (The Sun) pic.twitter.com/H3kBXtfsVe
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 8, 2023
दुसरीकडे, ऍलेक्स कॅरेने न्हाव्याला पैसे देण्याची मुदत ठरवली आहे. तो हेडिंग्ले कसोटी सामना संपल्यानंतर न्हावी ऍडम महमूदला 30 पाऊंड देईल. माध्यमांतील वृत्तांनुसार, महमूद म्हणाला की, ऑस्ट्रेलियन खेळाडूने नंतर पैसे देण्याचे वचन दिले होते. तेव्हापासून तो पैशांची वाट पाहत आहे. असे असू शकते की, तो सामन्यामुळे पैसे पाठवण्यास विसरला असेल.
सध्या ऍलेक्स कॅरे हेडिंग्ले कसोटी सामन्याचा भाग आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी येण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावत 116 धावांचा डोंगर उभारला आहे. यासह त्यांच्याकडे 142 धावांची आघाडी आहे. (cricketer alex carey got a haircut at a leeds barber shop and didnt pay barber adam mahmood alleges)
महत्वाच्या बातम्या-
फास्ट बॉलर्ससाठी गुड न्यूज! बीसीसीआयच्या निर्णयामुळे महत्वाच्या स्पर्धेत मिळणार फायदा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण विदेशी लीग खेळण्याबाबत रायुडूचा अचानक मोठा निर्णय