श्रीलंका महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात नुकतीच 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेचा अखेरचा सामना सोमवारी (दि. 03 जुलै) पार पडला. हा सामना श्रीलंका संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 8 विकेट्सने जिंकला. या विजयासह श्रीलंकेने 2-1ने मालिका खिशात घातली. श्रीलंकेच्या या विजयात कर्णधार चमारी अटापट्टू हिने मोलाची भूमिका बजावली. तिने या मालिकेत दोन शतके झळकावत आयसीसी महिला वनडे रँकिंग यादीत अव्वलस्थान गाठले. तसेच, भारताची माजी कर्णधार मिताली राज हिचा विक्रमही मोडीत काढला.
अटापट्टूचा विक्रम
श्रीलंका संघाची कर्णधार चमारी अटापट्टू (Chamari Athapaththu) हिने आयसीसी महिला वनडे रँकिंग यादीत अव्वलस्थान पटकावले. यासह ती असा विक्रम करणारी श्रीलंकेची पहिलीच महिला खेळाडू बनली. अटापट्टू अशाप्रकारे सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याने केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. जयसूर्या सप्टेंबर 2002 आणि मे 2003 यादरम्यान 181 दिवस पुरुषांच्या वनडे फलंदाजी रँकिंगमध्ये अव्वलस्थान पटकावणारा एकमेव श्रीलंकन खेळाडू आहे.
Chamari Athapaththu makes history as the first player from Sri Lanka ???????? to top the ICC Women’s ODI Player Rankings!
???????????????????? The left-handed opener follows in the footsteps of Sanath Jayasuriya, who was the only Sri Lankan player to achieve this feat in the men’s ODI… pic.twitter.com/VqpxEfWEqd
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) July 4, 2023
बेथ मूनीसह ‘या’ खेळाडूंना पछाडले
अटापट्टूच्या तीन सामन्यात दोन शतकांनी तिला सहा स्थानांचा फायदा मिळवून दिला. यामुळे तिने हरमनप्रीत कौर, मेग लॅनिंग आणि लॉरा वोल्वार्ड यांसारख्या खेळाडूंना मागे सोडले आहे. तसेच, बेथ मूनी हिच्याकडून अव्वलस्थान हिसकावून घेतले आहे. बेथ मूनी मे महिन्यापासून अव्वलस्थानी होती.
महिला वनडे रँकिंगमधील अव्वल 6 खेळाडू
1. चमारी अटापट्टू
2. बेथ मूनी
3. लॉरा वोल्वार्ड
4. नॅट सायव्हर
5. मेग लेनिंग
6. हरमनप्रीत कौर
मिताली राजचा विक्रम मोडीत
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना अटापट्टू हिने अवघ्या 60 चेंडूत शतक झळकावलं होतं. हे शतक झळकावताच तिच्या नावावर वनडेत सर्वाधिक 8 शतकांची नोंद झाली. यासह तिने भारताची माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिचा विक्रमही मोडीत काढला. मितालीच्या नावावर वनडेत 7 शतकांची नोंद आहे. याव्यतिरिक्त वनडेत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिच्या नावावर आहे. लॅनिंग हिने वनडेत 15 शतके झळकावली आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध शानदार कामगिरी
अटापट्टू हिच्या न्यूझीलंडविरुद्धच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर तिने पहिल्या सामन्यात 83 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या होत्या. तसेच, अंतिम सामन्यात नाबाद 140 धावांची खेळी साकारत प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला. याव्यतिरिक्त तिला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कारानेही गौरवण्यात आले. या मालिकेत तिने 3 सामन्यात फलंदाजी करताना 248च्या सरासरीने आणि 151.22च्या स्ट्राईक रेटने 248 धावांचा चोपत सर्वाधिक धावा करण्याचाही मान पटकावला. (cricketer Chamari Athapaththu becomes first srilanka player to top icc womens odi rankings)
महत्वाच्या बातम्या-
तोंडात निप्पल, खाली डायपर; स्टोक्सला बाळाच्या रूपात दाखवल्याने पेटला वाद, कर्णधाराने दिले सडेतोड प्रत्युत्तर
रैनाचा विराटबाबत मोठा खुलासा! म्हणाला, “आम्ही खेळत असताना तो नेहमी…”