---Advertisement---

गर्लफ्रेंड पटवण्यात ख्रिस गेल माहीर! भारतातही लावला नंबर, स्वत:च केला खुलासा

Chris-Gayle
---Advertisement---

जागतिक क्रिकेट गाजवणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ख्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांचाही समावेश होतो. या दोघांनीही नुकतेच टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ या प्रसिद्ध कार्यक्रमाला हजेरी लावली. यादरम्यान गेल आणि लीने प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले आणि कपिल शर्मा याच्या मजेशीर प्रश्नांची उत्तरेही दिली. यातील एक प्रश्न गर्लफ्रेंडविषयीचाही होता.

ख्रिस गेलच्या भारतात गर्लफ्रेंड किती?
कपिल शर्मा (Kapil Sharma) याने जेव्हा ख्रिस गेल (Chris Gayle) याला भारतातील गर्लफ्रेंडविषयी विचारले. यावर युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेलने आपल्या उत्तराने सर्वांना हसण्यास भाग पाडले. गेल म्हणाला की, “भारतात माझ्या जास्त नाही फक्त 2 गर्लफ्रेंड आहेत.” गेलचे हे उत्तर ऐकल्यानंतर कपिलसोबतच सर्व प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

या शोमध्ये कपिल दोन्ही क्रिकेटपटूंना विचारतो की, ते नवज्योत सिंग सिद्धू यांना मिस करत आहेत का? यावर गेल म्हणतो की, “नाही, मी मिस करत नाहीये.” हे ऐकताच परीक्षक अर्चना पूरन सिंग जागेवरून उठते आणि टाळ्या वाजवू लागते. दुसरीकडे, ब्रेट ली (Brett Lee) अर्चनाचे कौतुक करताना दिसतो. तो म्हणतो की, “या सुंदर मुलीला पाहणे चांगले आहे.” दोन्ही क्रिकेटपटूंची उत्तरे ऐकल्यानंतर सर्वजण हसू लागतात.

https://www.instagram.com/reel/Cs-1XUVIO-8/?utm_source=ig_embed&ig_rid=771b97dd-c286-481d-86a6-882ef5a29ed7

विशेष म्हणजे, ब्रेट ली आणि ख्रिस गेल यापूर्वीही कपिलच्या शोमध्ये दिसले आहेत. यापूर्वी जेव्हा दोन्ही क्रिकेटपटू या शोमध्ये आले होते, तेव्हा अर्चनाऐवजी नवज्योत सिंग सिद्धू परीक्षकाच्या भूमिकेत होते.

Comedy का Sixer | Chris Gayle, Brett Lee |The Kapil Sharma Show 2 | Ep 333 | 4 June 2023

ख्रिस गेल आणि ब्रेट ली हे दोघेही आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसाठी दोन महिन्यांपूर्वी भारतात आले होते. गेल आता आयपीएलमध्ये खेळत नाही, तर तो तज्ज्ञ म्हणून या स्पर्धेचा भाग झाला आहे. तो शेवटचा आयपीएल 2021 हंगामात पंजाब किंग्स संघाकडून खेळताना दिसला होता. त्यावेळी त्याने 10 सामन्यात 21.44च्या सरासरीने 193 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याने त्याचे अखेरचे चार हंगाम पंजाब संघाकडून खेळले. (cricketer chris gayle revealation said he has only 2 girlfriends in india the kapil sharma show)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! वेस्ट इंडिज अन् अमेरिकेत होणार नाही T20 World Cup 2024 स्पर्धेचं आयोजन? वाचा
हा खेळ 27 धावांचा, WTC Final मध्ये ‘हिटमॅन’ मोडेल का सेहवाग अन् सचिनचे रेकॉर्ड?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---