इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महाकुंभमेळा 31 मार्चपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकतेच सनरायझर्स हैदराबाद संघाने एडेन मार्करम याला कर्णधार म्हणून निवडले. तसेच, आता दिल्ली कॅपिटल्स संघानेही रिषभ पंत याला कर्णधारपदावरून हटवले आहे. मागील वर्षीच्या अखेरीस झालेल्या अपघातानंतर पंत पूर्णत: बरा झाला नाहीये. तसेच, त्याची आयपीएल खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे त्याला कर्णदारपदावरून हटवत त्याच्या जागी डेविड वॉर्नर याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्याचे वृत्त आहे. तसेच, अक्षर पटेल याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्याचे वृत्तांमध्ये सांगण्यात आले आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबर, 2022 रोजी दिल्लीहून रुडकी जाताना अपघात झाला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्याला मुंबईच्या धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच पंतने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तो कुबडीच्या आधारे चालताना दिसला होता.
डेविड वॉर्नर कर्णधार, तर अक्षर पटेल उपकर्णधार
माध्यमातील वृत्तांनुसार, डेविड वॉर्नर (David Warner) याच्याकडे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाशी जोडलेल्या एका सदस्याने सांगितले की, “डेविड वॉर्नर आमचा कर्णधार असेल आणि अक्षर पटेल उपकर्णधाराची भूमिका साकारेल.”
डेविड वॉर्नरबाबत बोलायचं झालं, तर त्याने कर्णधार म्हणून सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. त्याने 2016मध्ये संघाला चॅम्पियन बनवले होते. त्याच्याकडे आयपीएलचा मोठा अनुभव आहे. कदाचित त्यामुळेच वॉर्नरकडे दिल्लीचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याच्यावर दिल्लीला पहिली-वहिली आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याची जबाबदारी असेल. मात्र, वॉर्नर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. अशात, तो भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, त्यानंतर लगेच आयपीएल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. (cricketer david warner named delhi capitals captain for ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियातील मराठमोळ्या क्रिकेटपटूवर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वकाही सोडून थेट घरी परतला
‘तो बाहेर होणार होता, पण विराटने त्याला पाठिंबा दिला’, दिनेश कार्तिकने कुणाबद्दल केला मोठा खुलासा?