यंदाच्या आयपीएलच्या १५व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक शानदार कामगिरी करत आहे. कार्तिकने या हंगामात आपल्या संघाला अनेक प्रसंगी महत्त्वाचे सामने जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने आपल्या फलंदाजीतून धावांचा पाऊस पाडत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केलीये. असेच काहीसे कार्तिकने आयपीएल २०२२च्या २७व्या सामन्यात शनिवारी (दि. १६ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केले. बेंगलोरने या सामन्यात दिल्लीविरुद्ध १६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडिअममध्ये एका पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले. हे पोस्टर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय होते पोस्टरमध्ये?
खरं तर हे पोस्टर २ मुलींच्या हातात होते. दोघीही आपल्या बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला प्रोत्साहित करण्यासाठी स्टेडिअममध्ये पोहोचल्या होत्या. या पोस्टरवर लिहिले होते की, “१००० किलोमीटर गाडी चालवून आम्ही तुमच्यासाठी आलो आहोत आरसीबी. यावर्षी किताब आमचाच.” दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) यावर मजेशीर ट्वीट केले. त्याच्या ट्वीटने सर्वांची मने जिंकली. त्याने हसण्याच्या इमोजीसह लिहिले की, “आशा करतो की, तुम्ही गाडी चालवून येणे व्यर्थ ठरले नसावे.”
Hope the drive was worth it 🤗 https://t.co/EpMBHOmghQ
— DK (@DineshKarthik) April 17, 2022
दिनेश कार्तिकने ३४ चेंडूत चोपल्या नाबाद ६८ धावा
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कार्तिकने ३४ चेंडूत नाबाद ६८ धावांची वादळी खेळी केली. त्याने या खेळीदरम्यान ५ चौकार आणि ५ षटकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे बेंगलोर संघाने २० षटकात ५ विकेट्स गमावत १८९ धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला ७ विकेट्सच्या मोबदल्यात १७३ धावाच करता आल्या. दिल्लीकडून सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरने ३८ चेंडूत ६६ धावांची खेळी केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
बेंगलोर संघ ८ गुणांसह गुणतालिकत तिसऱ्या स्थानी
बेंगलोर संघाने या हंगामात आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यात त्यांनी ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, २ सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. ८ गुणांसह फाफ डू प्लेसिसचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. गुणतालिकेत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील संघ ८ गुणांसह पहिल्या आणि लखनऊ संघही ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात आणि लखनऊ संघाचा नेट रनरेट बेंगलोरपेक्षा चांगला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ समान गुण असूनही पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट बनला सुपरमॅन! हवेत झेप घेत एका हाताने पकडला पंतचा अफलातून कॅच; पाहून अनुष्काही झाली खुश
IPL2022| गुजरात वि. चेन्नई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!