इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्पचं (Graham Thorpe) वयाच्या 55व्या वर्षी नुकतंच निधन झालं. यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले. थॉर्पची पत्नी अमांडानं आता त्याच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे. अमांडानं सांगितले की, थॉर्प गेल्या दोन वर्षांपासून तब्येत बिघडल्यामुळे नैराश्य आणि चिंतेशी झुंजत होता. त्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.
थाॅर्पचं वयाच्या 55व्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी निधन झालं. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं त्याच्या मृत्यूची घोषणा केली होती, परंतु त्याचं कारण दिलं गेलं नाही. आता त्याच्या पत्नीनं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल आथर्टनला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, मृत्यूपूर्वी त्यानं स्वत:शी दीर्घ मानसिक आणि शारीरिक लढाई केली होती. ‘द टाइम्स’नं थॉर्पच्या पत्नीचा हवाला देत म्हटलं आहे की, “पत्नी आणि दोन मुली असूनही, ज्याच्यावर तो खूप प्रेम करतो आणि ज्याच्यावर तो मनापासून प्रेम करतो, तो स्व:ताला सावरु शकला नाही.”
ग्रॅहम थॉर्पची (Graham Thorpe) पत्नी म्हणाली, “ग्रॅहम गेल्या काही वर्षांपासून नैराश्य आणि चिंतेनं त्रस्त होता. या कारणास्तव त्यानं मे 2022 मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला ज्यामुळे त्याला अनेक दिवस आयसीयूमध्ये काढावे लागले. तो नैराश्य आणि चिंतेने झुंजत होता. त्यामुळे तो कधीकधी खूप गंभीर होत होता.”
ग्रॅहम थॉर्पच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं इंग्लंडसाठी 1993 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 100 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 179 डावात फलंदाजी करताना 6,744 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 44.66 राहिली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 39 अर्धशतक आणि 16 शतक आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 200 राहिली आहे. 82 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 37.18च्या सरासरीनं 2,380 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 71.17 राहिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 21 अर्धशतक झळकावली आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 82 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
WI vs RSA पहिला कसोटी सामना रद्द! भारताचं WTCच्या गुणतालिकेत मोठं नुकसान?
किती वर्षांनी कर्णधार रोहितचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन? जाणून घ्या एका क्लिकवर
नेपाळची क्रिकेट टीम करणार भारताचा दौरा, टीम इंडियाविरुद्ध मॅच खेळणार का?