---Advertisement---

आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेली काॅफी पंड्याला पडली भलतीच महागात

On: रविवार, एप्रिल 26, 2020 9:20 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने नुकतेच यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह चॅट केले. यादरम्यान दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. परंतु यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे कॉफी विथ करनमधील प्रकरणावर.

कॉफीच्या वादाबद्दल बोलताना पंड्या (Hardik Pandya) म्हणाला की, “तसं मी कधीच कॉफी पित नाही. परंतु माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा कॉफी (Coffee) प्यायलो होतो. ती मला सर्वात महाग पडली होती.”

यावेळी पंड्याने पुढे म्हटले की, “मी पैज लावतो की जेवढी महाग मला ती कॉफी पडली होती.  स्टारबक्सने तेवढ्या रुपयांची कॉफी विकलीदेखील नसेल. मी आता कॉफीपासून खूप दूर राहतो. तसेच मी खूप सांभाळून बोलतो. त्या घटनेमुळे माझं आयुष्य बदलले आहे.”

झाले असे की, पंड्या मागील वर्षी आपला संघसहकारी केएल राहुलबरोबर (KL Rahul) कॉफी विथ करन (Coffee with Karan) या शोमध्ये गेले होते. यावेळी पंड्याने स्त्रियांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्याला भारतीय संघातून काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते.

या लाईव्ह चॅटदरम्यान कार्तिकने (Dinesh Karthik) पंड्याला प्रश्न विचारला की, तो आपल्या होणाऱ्या पत्नीशी कोणत्या भाषेत चर्चा करतो? यावेळी पंड्याने प्रत्युत्तर दिले की, “मी इंग्रजी आणि हिंदी भाषेत चर्चा करतो. नताशाला हिंदी बोलता येते. ती तुझ्यापेक्षा चांगली हिंदी  बोलते आणि समजूनही घेते.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-जर आयपीएल झाली नाही तर १० कोटींवर पाणी सोडावे लागणारे ५ खेळाडू

-७ एकरांवर आहे धोनीचं फार्महाऊस, ५ स्टार हाॅटेल व इनडोअर स्टेडियमसह या आहेत सुविधा

-अबब! विराट एका दिवसाला कमावतो ७० लाख रुपये, कसे ते घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---