न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने आधीच आपल्या नावावर केला आहे. अशात शुक्रवारपासून (दि. 17 मार्च) दुसरा कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, जो यजमान संघाच्या खेळाडूंनी प्राथमिकरीत्या चुकीचा सिद्ध केला. या सामन्यात केन विलियम्सन आणि हेन्री निकोल्स यांच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध मोठा डोंगर उभारला. विलियम्सनने कसोटी कारकीर्दीतील सहावे द्विशतक ठोकले. तसेच, निकोल्सही चमकला. अशात विलियम्सनच्या खेळीवर भारतीय दिग्गजही खुश झाला. त्याने ट्विटरवर मीम्स शेअर करत विलियम्सनचे कौतुक केले.
केन विलियम्सन (Kane Williamson) याने द्विशतक ठोकताच भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) याने त्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे, विलियम्सनने या द्विशतकासोबतच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विलियम्सनने वेलिंग्टन येथे 296 चेंडूंचा सामना करताना 215 धावांची वादळी खेळी साकारली. या धावा करताना त्याने 23 चौकार आणि 2 षटकारही मारले. तसेच, हेन्री निकोल्स (Henry Nicholls) यानेही 240 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 200 धावा चोपल्या. या दोघांमध्ये 363 धावांची विक्रमी भागीदारी झाली.
जाफरने केली प्रशंसा
वसीम जाफर याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मीम्स शेअर करत लिहिले की, “रोज उठा, अंघोळ करा, विलियम्सनची प्रशंसा करा, आणि झोपून जा.” हे ट्वीट आता जोरदार व्हायरल होत आहे.
Well played Kane Williamson 👏🏽 #doubleton #NZvSL pic.twitter.com/vHQ3tD65Qf
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 18, 2023
केन विलियम्सन हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने यापूर्वी सलग दोन शतके झळकावली होती. त्यापूर्वी त्याने इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध मागील कसोटीत शतक केले होते. न्यूझीलंडच्या डावाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी पहिला डाव 4 विकेट्स गमावत 580 धावांवर घोषित केला आहे.
Test double century number SIX for Kane Williamson! His second against Sri Lanka at the @BasinReserve. Follow play LIVE in NZ with @sparknzsport. #NZvSL pic.twitter.com/q6I7u7sFgR
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 18, 2023
सचिन सेहवागच्या क्लबमध्ये एन्ट्री
केन विलियम्सन द्विशतकासह सचिन, सेहवाग, रिकी पाँटिंग, युनिस खान, जावेद मियाँदाद आणि मर्व्हन अट्टापट्टू यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे. या सर्व फलंदाजांनी कसोटीत प्रत्येकी 6 द्विशतके झळकावली आहेत. विलियम्सनने यादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावाही पूर्ण केल्या आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा न्यूझीलंडचा फलंदाज बनला आहे. त्याने रॉस टेलर याचाही विक्रम मोडीत काढला आहे. कसोटीत विलियम्सनच्या 8124 धावा आहेत, तर निवृत्ती घेतलेल्या टेलरच्या 7683 धावा आहेत. (cricketer kane williamson hits 6th double century in test equals sachin tendulkar virender sehwag record wasim jaffer reacts see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन्सी मिळताच पंड्या बनला घमंडी, चालू सामन्यात विराटला दिली वाईट वागणूक? व्हिडिओ पाहाच
‘जडेजा आणि माझा फक्त एकच प्लॅन होता…’, वानखेडेत वादळ आणणाऱ्या राहुलकडून रणनीतीचा खुलासा