जगभरातील अनेक देश क्रिकेट खेळतात. या देशांचे अनेक खेळाडूंनी धावांचा पाऊस पाडून, विक्रमांचे मनोरे रचून आपले नाव दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत नोंदवले आहे. आता या यादीत नाव नोंदवण्यासाठी अनेक युवा खेळाडू जोमाने प्रयत्न करत आहेत. दिग्गज खेळाडूंची नजरही या युवा खेळाडूंवर असते. या युवा खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल याचाही समावेश आहे. शुबमनने मागील काही काळात आपल्या फलंदाजीमुळे जागतिक क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटूंचे लक्ष वेधून घेतले आहे. अशात न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन याने शुबमन गिलबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला केन विलियम्सन?
न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज केन विलियम्सन (Kane Williamson) याने भारताचा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याला खास खेळाडू म्हटले आहेत. तसेच, त्याने आशा व्यक्त केली आहे की, त्याला भारत आणि गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. विलियम्सन म्हणाला की, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिपक्व झाल्यानंतर त्याला ही जबाबदारी मिळू शकते.
विलियम्सनने बुधवारी (दि. 29 मार्च) म्हटले की, “गिलसाठी हे एक अविश्वसनीय वर्ष होते. मात्र, तुम्हाला नेहमी वाटू शकते की, हे फक्त एका वेळेबद्दल आहे. आपण मागील काही वर्षांमध्ये पाहिले आहे की, त्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे. तो एक युवा आणि अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. आगामी काळात त्याला त्या कर्णधारांकडून अनुभव घ्यावा लागेल, ज्यांच्या नेतृत्वाखाली तो खेळत आहे.”
आयपीएल इम्पॅक्ट प्लेअरवरही बोलला विलियम्सन
पुढे बोलताना विलियम्सन म्हणाला की, “आयपीएलमध्ये इम्पॅक्ट खेळाडूचा नियम रोमांचक आहे. यामुळे संघाला प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी जास्त विचार करावा लागेल. यामुळे बराच बदल होईल. जेव्हा तुम्ही संघ निवडता, तेव्हा तुम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या भूमिकेवर लक्ष देता. हे सर्वांसाठीच नवीन आहे, आता हे पाहावे लागेल की, याचा वापर कसा होतो. हा एक असा नियम आहे, ज्याचा सर्व संघ आपल्या फायद्यासाठी वापर करतील. हे पाहणे रंजक असेल.”
आयपीएलमध्ये विलियम्सनची कामगिरी
विशेष म्हणजे, केन विलियम्सन याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघ 2018च्या हंगामात अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र, मागील हंगामात संघाने खराब कामगिरी केली होती. अशात, संघाने त्याला बाहेर केले. मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्याने राष्ट्रीय संघाचे कर्णधारपदही सोडले होते. यानंतर तो म्हणाला होता की, “कर्णधारपद सोडल्याने तुम्ही खेळताना विचार करणे बंद करत नाहीत. जेव्हा तुम्ही मैदानात असता, तेव्हा तुम्ही संघासाठी जितके होऊ शकेल, तितके चांगले करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही तुमच्या विचारांनी इतरांची मदत करता.”
Gill bhai jeet leta hai sabka 💙#AavaDe pic.twitter.com/TkKdBUS3Tx
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 29, 2023
आयपीएल 2023बाबत बोलायचं झालं, तर 16वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे. केन विलियम्सन याला गुजरात टायटन्स संघाने मिनी लिलावात 2 कोटींच्या मूळ किंमतीत संघात सामील करून घेतले होते. दुसरीकडे, शुबमन गिल हादेखील गुजरात संघाचाच भाग आहे. अशात त्यालाही विलियम्सनसारख्या दिग्गज फलंदाजासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याचा आणि फलंदाजीचे धडे घेण्याचा फायदा होऊ शकतो. (cricketer kane williamson said shubman gill is future captain of india know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप फायनलसाठी अहमदाबादची वर्णी! जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांविषयी
मोठी बातमी! 16व्या आयपीएलसाठी समालोचकांची यादी जाहीर, वाचा सर्व स्टार समालोचकांची नावे