जेव्हाही कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने एखाद्या सामन्यात खराब कामगिरी केली, तर त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, एखादा खेळाडू जर सातत्याने खराब फॉर्मचा सामना करत असेल, तर चाहते त्याला ट्रोल केल्याशिवाय राहत नाहीत. असाच एक खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल होय. ट्रोलिंगचा सामा करणाऱ्या खेळाडूंमध्ये राहुल आघाडीवर आहे. मात्र, आता ट्रोल होण्याविषयी पहिल्यांदाच केएल राहुलने मौन सोडले.
मागील काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करत असलेला लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) खराब स्ट्राईक रेट आणि कर्णधारपदामुळे नेहमीच सोशल मीडियावर चेष्टेचा विषय बनत आला आहे.
काय म्हणाला राहुल?
राहुलने द रणवीर शोमध्ये रणवीर अल्लाहबादिया (Ranveer Allahbadia) याच्यासोबत याबाबत चर्चा केली. राहुल म्हणाला की, “हे काही असे आहे, जे कधीकधी मला प्रभावित करते. तसेच, अनेक मुलांनाही प्रभावित करते. जेव्हाही आम्हा खेळाडूंना वास्तवात पाठिंब्याची आवश्यकता असते, तेव्हा लोकांना वाटते की, ते काहीही बोलू शकतात. जरा पाहा की, तो व्यक्ती कोणत्या काळातून जात आहे.”
विश्वचषक 2022नंतर राहुलला सोशल मीडियावर वारंवार निशाणा बनवले जात आहे. इतकेच नाही, तर माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनीही त्याच्या खराब प्रदर्शनावर मोकळेपणाने टीका केली होती. राहुल 2022मध्ये खेळाच्या कोणत्याही प्रकारात शतक ठोकण्यात अपयशी ठरला आहे. त्यानंतर त्याला वनडे, आंतरराष्ट्रीय टी20 आणि कसोटी क्रिकेटच्या उपकर्णधारपदावरून हटवले होते.
राहुलसाठी कठीण काळ होता, पण त्याने हे मान्य केले की, त्याने 200 टक्के योगदान दिले. मात्र, गोष्टी त्याच्या बाजूने गेल्या नाहीत. तो म्हणाला की, “आमच्यापैकी कुणालाही वाईट प्रदर्शन करू वाटत नाही. हे आमचे आयुष्य आहे. हे सर्व आम्ही करतो. जसे मी म्हणालो, मला क्रिकेटव्यतिरिक्त आणखी काही माहिती नाही. मी फक्त हेच काम करत आहे.”
पुढे बोलताना राहुल म्हणाला की, “कोणालाही असे का वाटेल की, मी माझ्या खेळाविषयी गंभीर नाहीये किंवा मेहनत करत नाहीये? दुर्दैवाने खेळात काहीच संबंध नाही. जसे की मी म्हणालो, तुम्ही कठोर मेहनत घेऊ शकता, जशी मी कठोर मेहनत करतो. मात्र, गोष्टी माझ्या बाजूने जात नाहीत.”
मांडीच्या दुखापतीमुळे राहुल आयपीएल 2023 (IPL 2023) आणि डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्यावर यशस्वीरीत्या सर्जरीही झाली आहे. राहुल आता बेंगलोरमध्ये एनसीएमध्ये दीर्घ रिहॅबसाठी तयार आहे. त्याचे वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी संघात पुनरागमन करण्याचे लक्ष असेल. (cricketer kl rahul breaks silence on trolling none of the athletes want to give performances intentionally)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेरच्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली करणार राडा, संघाकडून आली ‘ही’ सर्वात मोठी प्रतिक्रिया
नादच खुळा! नेट्समध्ये दिसली गुरबाजची ताकद, खतरनाक शॉट खेळताच कॅमेरा बनला निशाणा; Video Viral