मुंबई । दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट असलेल्या ‘दिल बेचार’ला चाहत्यांकडून अपार प्रेम मिळत आहे. सुशांतचा हा चित्रपट शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि रिलीज होताच सर्व विक्रम मोडले. आयएमडीबीवर या चित्रपटाचे रेटिंग 9.7 आहे, जी एक मोठी गोष्ट आहे.
अलीकडेच सुशांतसिंग राजपूतने मुंबईत आत्महत्या करून जीवन संपविले. मानसिक ताणतणावामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. सुशांतने अश्या प्रकारे जग सोडून गेल्याने चाहते खूपच भावूक झाले. यामुळे सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाला खूप प्रेम मिळत आहे.
सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ पाहून भारतीय क्रिकेटर मनोज तिवारी देखील रडला आहे. मनोज तिवारी यांनी स्वत: ट्विट करुन याबद्दल माहिती दिली.
Watched #DilBechara yesterday. I believe it was an instant connection with the movie 🎬 Outstanding display of acting skills by d actors, beautiful movie and a msg for everyone👍 Cried while watching d movie for various reasons. Blockbuster it is 🤙 pic.twitter.com/j5kSSjOvqj
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) July 25, 2020
मनोज तिवारी याने ट्वीट करून एक भावनात्मक संदेश लिहिला, ‘”काल दिल बेचारा पाहिला. चित्रपटात कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला. सुंदर चित्रपट आणि सर्वांसाठी एक खास संदेश. मी अनेक कारणांमुळे चित्रपट पाहताना रडलो. ब्लॉकबस्टर चित्रपट.”
मनोजने त्याच्या ट्विटरचा डीपी देखील सुशांतचा ठेवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–मुंबई इंडियन्स आहे आयपीएल विजेतेपदाचा दुसरा प्रबळ दावेदार, तर या संघाला आहे सर्वाधिक संधी
–१९८३ विश्वविजेत्या भारतापेक्षा पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाले होते २६पट जास्त पैसे, रमीज राजाने शेअर केला फोटो
–आयर्लंडच्या क्रिकेटरला होतोय स्टेडियमधील खुर्च्यांचा त्रास, चेंडू शोधायला जातोय खूप वेळ
–आयपीएल २०२०साठी हा संघ सर्वात आधी जाणार दुबईला, काहाही करुन जिंकायची आहे आयपीएल ट्रॉफी
वाचनीय लेख-
–क्रिकेट वेडापायी वसईचा पाटील खेळला युएईकडून; कर्णधार होऊन केले भारताविरुद्धच दोन हात, वाचा संपुर्ण स्टोरी
–झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
–टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ४- शैलीच्या विपरीत खेळत डिविलीयर्सने २२० चेंडूत ३३ धावा केल्या, परंतू क्रिकेटरसिकांच्या हृदयात..