चार वेळा चेन्नई सुपर किंग्सला चॅम्पियन बनवणारा कर्णधार महेंद्र सिंग धोनी जेव्हाही नवीन आयपीएल हंगामात उतरतो, तेव्हा सर्वांच्या मनात एक प्रश्न येतो. तो म्हणजे, हा धोनीचा शेवटचा हंगाम तर नाही ना? तसेच, एमएस धोनी यालाही जेव्हा याबाबत विचारले जाते, तेव्हा तो हसत हसत या प्रश्नाला बगल देतो आणि अधिक काही बोलण्यास टाळतो. क्रिकेटची समीक्षा करणारा प्रत्येक व्यक्ती धोनीच्या आयपीएल निवृत्तीबाबत वेगवेगळी मते देत आहे. यामध्ये आणखी एका माजी खेळाडूच्या नावाचा समावेश झाला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने एमएस धोनी (MS Dhoni) याच्या निवृत्तीविषयी वेगळे मत मांडले आहे. कैफने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघातील धोनीचे महत्त्व सांगत म्हटले की, ‘कॅप्टन कूल’ आता एक खेळाडू म्हणून खेळत नाहीये, तर तो एका मार्गदर्शकाच्या रूपात खेळत आहे.
‘नवीन खेळाडूंना शिकवतो धोनी’
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कैफ म्हणाला की, धोनी नेहमीच नवीन खेळाडूंना शिकवतो. कारण, त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी करावी अशी त्याची इच्छा आहे. कैफ म्हणाला की, “माही आता एका खेळाडूच्या रूपात खेळत नाहीये, तर तो एका मार्गदर्शकाच्या रूपात खेळत आहे. तो संघाची निवड करतो आणि मैदानावर येतो. तो मोठ्या खेळाडूंना काही बोलत नाही, पण नवीन खेळाडूंना शिकवतो. त्याची इच्छा आहे की, प्रत्येक खेळाडूने त्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करावी. कारण, यामुळे संघाचे काम सोपे होईल.”
खरं तर, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020मध्येच निवृत्ती घेतली होती. मात्र, निवृत्तीच्या जवळपास 3 वर्षांनंतरही तो आयपीएल खेळत आहे. या हंगामात धोनी चेन्नईचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्या संघाने या स्पर्धेत आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. या हंगामात खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये चेन्नईने 5 सामने जिंकले आहे, तर 4 सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. चेन्नई सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. (cricketer mohammad kaif says ms dhoni no longer playing as a cricketer but as a mentor with csk ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्या हृदयाचे ठोके 200पर्यंत…’, शेवटच्या षटकात KKRच्या विजयाचा हिरो ठरलेल्या चक्रवर्तीचे मोठे भाष्य
‘ठंड रख…’, विराट-गंभीर वादानंतर युवराजची लक्षवेधी प्रतिक्रिया, ट्वीट होतंय व्हायरल