आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रमवारी जाहीर केली. आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुसऱ्या स्थानी आहे. सिराज अव्वल 10 खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय गोलंदाज आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा अव्वलस्थानी आहे. याव्यतिरिक्त फलंदाजांच्या रँकिंगमध्ये बाबर आझम अव्वलस्थानी आहे. अव्वल 5 फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचे तीन खेळाडू आहेत. या पाच खेळाडूंमध्ये शुबमन गिल हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. तसेच, अव्वल 10 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाहीये. बांगलादेशचा शाकिब अल हसन याबाबतीत अव्वलस्थानी आहे.
गोलंदाजांची यादी
आयसीसी वनडे रँकिंग गाजवणारा अव्वल गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) हा 705 गुणांसह अव्वलस्थानी आहे. तसेच, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा 691 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क 686 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, 680 गुणांसह न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा चौथ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त 666 गुणांसह मॅट हेन्री पाचव्या स्थानी आहे.
फलंदाजांची यादी
फलंदाजांच्या रँकिंगबद्दल बोलायचं झालं, तर शुबमन गिल हा 738 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तो अव्वल 5 फलंदाजांच्या यादीतील एकमेव भारतीय आहे. या बाबतीत 887 गुणांसह बाबर आझम अव्वलस्थानी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान असून त्याचे 784 गुण आहेत. तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा रस्सी व्हॅन डर ड्युसेन असून त्याचे 777 गुण आहेत. भारतीय फलंदाज विराट कोहली सातव्या स्थानी, तर रोहित शर्मा नवव्या स्थानी आहे.
Three Pakistan players in the top five ODI batters 🔥
The latest changes in the @MRFWorldwide ICC Men’s Player Rankings ⬇️https://t.co/1L07ZSzOZo
— ICC (@ICC) May 4, 2023
वनडे अष्टपैलू खेळाडूंची रँकिंग
वनडे अष्टपैलू रँकिंगमध्ये बांगलादेशचा शाकिब अल हसन (392) अव्वलस्थानी आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, राशिद खान तिसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा चौथ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त पाचव्या स्थानी जीशान मकसूद आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमधील अव्वल 20 खेळाडूंमध्ये फक्त एकच भारतीय आहे. हार्दिक पंड्या 13व्या स्थानी आहे. (cricketer mohammed siraj india bowler second number in icc odi ranking shubman gill virat kohli top 10 list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका ओव्हरमध्ये 36 नाही, तर फलंदाजाने चोपल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा, व्हिडिओ पाहून तोंडात घालाल बोटे
IPL संघांनो सावधान! 2 वर्ल्डकप जिंकणारा खेळाडू होणार KKRच्या ताफ्यात सामील, कोण आहे तो?