भारतीय संघातील पुनरागमनाचा मार्ग सोपा करण्यासाठी युवा फलंदाज पृथ्वी शॉ काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला. रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत पृथ्वी शॉ नॉर्थम्प्टनशायर संघाकडून पदार्पणाचा सामना खेळत होता. यादरम्यान त्याची सुरुवात विचित्र झाली. संघासाठी धावा करता असताना पृथ्वी शॉ हिटविकेट पद्धतीने बाद झाला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यासाठी काऊंटी क्रिकेटमधील (County Cricket) पदार्पण खास ठरले नाही. नॉर्थम्प्टनशायर (Northamptonshire) संघाकडून पहिला सामना खेळताना त्याला वेगवान उसळी चेंडूपुढे गुडघे टेकावे लागले. ग्लोस्टरशायर (Gloucestershire) संघाचा वेगवान गोलंदाज पॉल व्हॅन मीकरन (Paul van Meekeren) याने टाकलेला 16व्या षटकातील अखेरचा उसळी चेंडू पृथ्वीला खेळता आला नाही. वेगवान उसळी चेंडूवर पृथ्वीचे संतुलन बिघडले आणि त्याने स्वत:च आपली बॅट स्टम्पवर मारली. यावेळी पॉलच्या उसळी चेंडूवर त्याने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू थेट त्याच्या डोक्यावरून वेगान गेला. त्यामुळे त्याचे संतुलन बिघडले आणि त्याने विकेट गमावली. अशात पृथ्वी शॉ हिटविकेट (Prithvi Shaw Hitwicket) होऊन तंबूत परतला.
HIT WICKET!!!! 🚀
Paul van Meekeren with a fierce bumper that wipes out Prithvi Shaw who kicks his stumps on the way down. What a delivery! Shaw goes for 34.
Northants 54/6.#GoGlos 💛🖤 pic.twitter.com/EMYD30j3vy
— Gloucestershire Cricket (@Gloscricket) August 4, 2023
पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वी शॉ 35 चेंडूंचा सामना करताना फक्त 34 धावाच करू शकला. या खेळीत त्याने 1 षटकार आणि 2 चौकारही मारले.
संघाचा पराभव
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ग्लोस्टरशायर संघाने प्रथम फलंदाजी करताना जेम्स ब्रेसी (108) याच्या शतकाच्या जोरावर 48.4 षटकात सर्वबाद 278 धावा केल्या होत्या. या 279 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नॉर्थम्प्टनशायर संघाचे प्रयत्न कमी पडले. संघाला 48.1 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 255 धावाच करता आल्या. यावेळी पृथ्वीच्या संघाकडून टॉम टेलर या फलंदाजाने 88 चेंडूत 112 धावांची शतकी खेळी साकारली होती. तरीही संघाला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे हा सामना ग्लोस्टरशायर संघाने 23 धावांनी जिंकला.
पृथ्वी शॉ आयपीएल 2023
काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यापूर्वी पृथ्वीने एक सराव सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले होते. त्याने 39 चेंडूत 65 धावा केल्या होत्या. खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम पृथ्वीसाठी कदाचित एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणेच ठरला होता. या स्पर्धेत त्याने 8 सामन्यात फलंदाजी करताना 13.25च्या सरासरीने 106 धावा केल्या होत्या. त्यात फक्त 1 अर्धशतकाचा समावेश होता.
याव्यतिरिक्त पृथ्वीला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी घोषित झालेल्या भारतीय संघातही निवडले नाहीये. शॉने भारतीय संघाकडून अखेरचा सामना 2021मध्ये श्रीलंका दौऱ्यावर खेळला होता. (cricketer prithvi shaw gets hit wicket against paul van meekeren in england county cricket for northamptonshire)
महत्त्वाच्या बातम्या-
The Hundred लीगमध्ये जॉर्डनचे रौद्ररूप! ‘एवढ्या’ चेंडूत ठोकल्या नाबाद 70 धावा, षटकारांची संख्या वाचाच
बिग ब्रेकिंग! स्टार खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त, 2 दिवसात 3 धुरंधरांनी ठोकला क्रिकेटला रामराम