---Advertisement---

‘आता तू नाहीये म्हणून मीच…’, धोनीच्या वाढदिवशी पंतने उचलले ‘हे’ पाऊल, पाहा कसे केले सेलिब्रेशन

On: शुक्रवार, जुलै 7, 2023 3:50 PM
Rishabh-Pant
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी शुक्रवारी (दि. 07 जुलै) 42वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त धोनीवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, यामध्ये सर्वात खास शुभेच्छा ठरल्या, त्या युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या. पंतने धोनीला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्याच्या शुभेच्छांची चर्चा सर्वत्र रंगली आहे. तसेच, त्याची पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

रिषभ पंतची पोस्ट
एमएस धोनी (MS Dhoni) याच्या वाढदिवसानिमित्त रिषभ पंत (Rishabh Pant) याचा खास अंदाज पाहायला मिळाला आहे. पंतने त्याचा गुरू धोनीच्या वाढदिवशीचा केक स्वत:च कापला आहे. पंतने सोशल मीडियावर केक कापतानाचा फोटोही शेअर केला आहे. पंतने केक कापल्यानंतर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा माही भाई… तुम्ही आता जवळ नाहीत, तुमच्यासाठी केक कापून घेतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

https://www.instagram.com/p/CuYu_dJtzYw/?utm_source=ig_embed&ig_rid=47cf2b4c-8214-40d0-859c-84219baab925

आता चाहत्यांना पंतचा हा अंदाज खूपच आवडला आहे. त्याच्या पोस्टला इंस्टाग्रामवर 7 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 5 हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर या पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहते या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडत आहेत. एका युजरने लिहिले की, “जेव्हा स्पायडर थालाला भेटतो.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “खूप छान आहे रिषभ.” आणखी एकाने लिहिले की, “छोटा धोनी.”

खरं तर, पंत ‘माही’ला आपला गुरू मानतो. तसेच, जेव्हाही वेळ मिळतो, तेव्हा तो धोनीकडे जाऊन त्याचा सल्ला घेतो. पंतव्यतिरिक्त रवींद्र जडेजा, सुरेश रैना यांसारख्या खेळाडूंनीही पोस्ट शेअर करत धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जडेजाने पोस्ट शेअर करत लिहिले की, “2009पासून आजपर्यंत आणि कायमसाठी माझ्यासाठी ‘गो टू मॅन’. माही भाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच येलो रंगात तुमच्याशी भेट होईल.”

याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स संंघानेही सोशल मीडियावरून धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आयपीएल 2024मध्ये खेळताना दिसण्याची शक्यता
एमएस धोनीच्या नेतृत्वातील आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभूत करत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावली. अंतिम सामन्यानंतर धोनीने म्हटले होते की, त्याच्या शरीराने साथ दिली, तर तो आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेत खेळताना दिसू शकतो. (cricketer rishabh pant celebrating the birthday of ms dhoni see post)

महत्वाच्या बातम्या-
बाप कर्णधार असला तरीही धोनी खेळला आहे ‘या’ ५ सिनीयर-ज्युनियर कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली
अखेर वर्ल्डकपचे ‘सुपर 10’ संघ ठरले! असे आहे टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---