ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या आठवा हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सध्या सराव सामने आणि क्वालिफायर सामने खेळले जात आहे. यानंतर पुढील आठवड्यापासून सुपर 12 फेरीतील सामन्यांना सुरुवात होईल. यामध्ये भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ 23 ऑक्टोबर रोजी आमने-सामने येतील. त्यांचा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळला जाईल. या सामन्यापूर्वी आता भारतीय संघातून जी बातमी समोर येत आहे, ती चिंताजनक आहे. ही बातमी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्याशी संबंधित आहे.
सोशल मीडियावर रिषभ पंत (Rishabh Pant) याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत पंत पायाला बँडेज बांधून बसल्याचे दिसत आहे. त्याच्या या फोटोंवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळेच तो सोमवारी (दि. 17 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघात सामील झाला नव्हता. या फोटोंमध्ये पंत दुखापत झाल्याचे फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
Looks like @RishabhPant17 hurt his leg in the practice.
Hope it is not serious 🤞
📸: Disney + Hotstar#T20WorldCup #T20WorldCup2022 #RishabhPant pic.twitter.com/MigbNPJoiE
— Kumar Gourav (@TheKumarGourav) October 17, 2022
या फोटोंमध्ये पंत मैदानाच्या बाहेर बसल्याचे दिसत आहे. तसेच, त्याच्यासोबत संघसहकारी बोलतानाही दिसत आहेत. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आणि पंतने अद्याप त्याच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्थान मिळवण्यासाठी पंत आणि कार्तिकमध्ये टक्कर
विशेष म्हणजे, टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघाने ताफ्यामध्ये पंत आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोन यष्टीरक्षक फलंदाजांना सामील केले आहे. आता 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पंत आणि कार्तिक यांच्यापैकी कोणाला ताफ्यात सामील केले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना भारताच्या नावावर
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला सराव सामना 6 धावांनी आपल्या नावावर केला. यामध्ये दिनेश कार्तिक याने फलंदाजी करताना 14 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारत 20 धावांचे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ममता बॅनर्जींचा गांगुलीला पाठिंबा; म्हणाल्या, ‘सौरवने स्वत:ला सिद्ध केलंय, मोदीजी…’
‘चेंडू मारण्याची इच्छाच होत नाहीये यार’, म्हणताच पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार आऊट; आवाज कॅमेऱ्यात कैद