भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याचे 8 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले. मात्र, तो ही सुवर्णसंधीचा फायदा घेण्यात सपशेल अपयशी ठरला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये संजूचे नाव पाहून नेटकरी खूपच खुश झाले होते. मात्र, काही वेळातच त्यांचा आनंद निराशेत बदलला. खरं तर, संजू अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही आणि लवकरच तंबूत परतला. त्याच्या या खराब प्रदर्शनानंतर आता त्याची विश्वचषक 2023चा मार्ग कठीण असल्याचे दिसत आहे. तसेच, सामन्यातील खराब प्रदर्शनानंतर नेटकरीही सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात जेव्हा संजू सॅमसन (Sanju Samson) याला संधी मिळाली नव्हती, तेव्हा नेटकऱ्यांनी संघ व्यवस्थापनावर टीकास्त्र डागले होते. मात्र, आता दुसऱ्या वनडेत जेव्हा त्याला संधी दिली, तेव्हा तो खास कमाल करू शकला नाही. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना दुसऱ्या वनडेसाठी विश्रांती देण्यात आली होती. रोहितच्या जागी सॅमसनला, तर विराटच्या जागी अक्षर पटेलला संधी दिली गेली होती.
सॅमसनकडे यावेळी स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी होती. शुबमन गिल, अक्षर पटेल आणि प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) स्वस्तात तंबूत परतले होते. भारतीय संघाला पहिला धक्का 90 धावसंख्येवर शुबमन गिलच्या रूपात बसला होता. त्यानंतर सॅमसनला क्रीझवर येण्याची संधी मिळाली. यावेळी त्याच्याकडे चांगली संधी होती. बऱ्याच महिन्यांनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. त्यामुळे तो मोठी खेळी साकारून दावेदारी सिद्ध करेल अशी अपेक्षा होती, पण तो अपयशी ठरला. तब्बल 247 दिवसांनंतर संघात जागा मिळवणाऱ्या सॅमसनकडून चाहत्यांना भरपूर अपेक्षा होती, पण त्याने निराश केले. त्याच्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला.
सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
“Sanju samson for no 4 position” ☕️ pic.twitter.com/qUFxS8ImHF
— Dennis❤️ (@DenissForReal) July 29, 2023
Justice for Sanju Samson ☕☕🤣 pic.twitter.com/WRfAtu0t1M
— Rowan 𝕏 (@JustLikeGon) July 29, 2023
Ruturaj Gaikwad, man with a golden heart ❤️ pic.twitter.com/Gg05KZFBw2
— Pr𝕏tham (@Prxtham_18) July 29, 2023
Let's Laugh On Waterless Team Captain Sanju Samson Dismissed On 9(19). https://t.co/t5YFFpgZXd pic.twitter.com/aIDCFpcUZj
— Aufridi Chumtya (@ShuhidAufridi) July 29, 2023
सॅमसनची खेळी
संजू सॅमसन या सामन्यात फक्त 9 धावा करू शकला. त्याने 9 धावा करण्यासाठी 19 चेंडूंचा सामना केला. त्याला या खेळीत 1 चौकारही मारता आला नाही. फिरकीपटू यानिक कारिया याच्या गोलंदाजीवर सॅमसनने स्लिपमध्ये उभ्या असलेल्या ब्रेंडन किंग याच्याकडून झेलबाद होवून तंबूचा रस्ता पकडला.
सॅमसनचा अखेरचा वनडे सामना
सॅमसनने यापूर्वी अखेरचा वनडे सामना 25 नोव्हेंबर, 2022 रोजी खेळला होता. त्यावेळी तो न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरला होता. त्यावेळीही तो खास कामगिरी करू शकला नव्हता. त्याला 36 धावांवर तंबूचा रस्ता पकडावा लागला होता.
आता संजूला विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत जागा मिळण्याचे कठीण दिसत आहे. भारतीय संघ सध्या प्रयोग करत आहे. प्रत्येक जागेसाठी दावेदार आहेत. जर या खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा फायदा उचलता येत नसल्याने त्यांचा विश्वचषकाचा मार्ग कठीण होत जातोय.
सामन्याचा थोडक्यात आढावा
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशनच्या (55) अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद 181 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने 4 विकेट्स गमावत 182 धावा केल्या आणि 6 विकेट्सने सामना जिंकला. भारताकडून यावेळी शार्दुल ठाकूर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. अशात आता मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ 1 ऑगस्ट रोजी त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडिअमवर एकमेकांचा आमना-सामना करतील. (cricketer sanju samson flop after getting 247 days entry in against west indies in 2nd odi)
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त ‘या’ कारणामुळे दुसऱ्या वनडेत खेळले नाहीत रोहित-विराट, हार्दिक पंड्याने स्वत: केला खुलासा
‘मी कासव आहे…’, म्हणत हार्दिक पंड्याने कुणावर फोडले पराभवाचे खापर? लगेच वाचा