भारताचा वेस्ट इंडिज दौरा पुढील महिन्यात 12 जुलैपासून सुरू होत आहे. यापूर्वी शुक्रवारी (दि. 23 जून) भारतीय संघाच्या कसोटी आणि वनडे संघाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर वादाला ठिणगी पडली. कसोटी संघात चेतेश्वर पुजाराला बाहेर काढल्याने आणि सरफराज खान याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चाहत्यांचा संताप उडाला आहे. तसेच, बीसीसीआयच्या निवड समितीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा सरफराज खान दीर्घ काळापासून भारतीय संघाचे दार ठोठावत आहे, पण त्याला प्रतीक्षेशिवाय काहीच मिळत नाहीये. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडल्यानंतर सरफराजही हैराण झाला आणि त्याने आपल्या अंदाजात यावर आपली प्रतिक्रिया दिली.
खरं तर, 25 वर्षीय सरफराज खानने इंस्टाग्राम स्टोरीवर (Sarfaraz Khan Instagram Story) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या स्टोरीतून सरफराज खान (Sarfaraz Khan) याने निवडकर्त्यांवर निशाणा साधला आहे. व्हिडिओ स्टोरीमध्ये सरफराजने मागील रणजी ट्रॉफी हंगामातील आपल्या सर्वोत्तम खेळी दाखवल्या आहेत, ज्यात त्याची शानदार आकडेवारीही दिसत आहे. युवा फलंदाजाची ही आकडेवारी आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Sarfaraz Khan’s Instagram story. pic.twitter.com/g4I7PGIiAP
— CricketMAN2 (@ImTanujSingh) June 25, 2023
यासोबतच त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर नेट्सचा फोटोही शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एकच प्रेम.” या पोस्टच्या बॅकग्राऊंडला ‘लक्ष्य’ सिनेमाचे टायटल ट्रॅक वाजत आहे. खरं तर, मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सरफराजची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी ही जवळपास 80 आहे. त्याने मागील 3 रणजी हंगामात 100 हून अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत.
सरफराजची प्रथम श्रेणी कारकीर्द
सरफराज खान याच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 37 सामन्यातील 54 डावात 79.65च्या सरासरीने 3505 धावा चोपल्या आहेत. यामध्ये 13 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 301 आहे. त्याच्या बॅटमधून 2022-23 रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) हंगामातील 6 सामन्यात 92.66च्या सरासरीने 556 धावांचा पाऊस पडला आहे. (cricketer sarfaraz khan posts a story on instagram over his non selection for the west indies tour)
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या महिला क्रिकेटरचा भीमपराक्रम! ऍशेसमध्ये द्विशतक ठोकत 88 वर्षे जुना विक्रम केला उद्ध्वस्त
क्वालिफायरमध्ये बलाढ्य विंडीजच्या नांग्या ठेचल्यानंतर रझाचं विधान; म्हणाला, ‘भारतात जायच्या भूकेने…’