क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तो युनायटेड स्टेट्सवरून ढाका येथे परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळला. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) डॉक्टर मंजूर हुसेन यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. शाकिबला कोरोनाची लागण झाल्याने बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. (Bangladesh All Rounder Shakib Al Hasan Corona Positive)
श्रीलंका संघाला बांगलादेशविरुद्ध (Bangladesh vs Sri Lanka) २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यातील पहिला सामना १५ मेपासून सुरू होणार आहे. मात्र, आता शाकिब अल हसन कोरोनाग्रस्त (Shakib Al Hasan Corona Positive) झाल्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाहीये.
येत्या १५ मेपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या कसोटीत शाकिब खेळू शकेल का, असे विचारले असता, मंजूर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, “कोणतीही शक्यता नाही. कारण, आमच्या कोव्हिड प्रोटोकॉलनुसार, त्याला ५ दिवस विलगीकरणात ठेवावे लागेल. अशा परिस्थितीत, शाकिबची पुढील चाचणी १४ तारखेला होईल आणि हा फिटनेसचा प्रश्न आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शाकिब ढाका प्रीमियर लीगनंतर (Dhaka Premier League) आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवण्यासाठी यूएसएला गेला होता. श्रीलंकेविरुद्ध बांगलादेशच्या पहिल्या कसोटीपूर्वी १२ मे रोजी तो सरावात सहभागी होणार होता, पण आता कोव्हिड-१९ ने त्याच्या योजनेवर पाणी फेरले.
शाकिबची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
शाकिब अल हसनने आतापर्यंत ५९ कसोटी सामने खेळताना १०९ डावात ३९.५०च्या सरासरीने ४०२९ धावा केल्या आहेत. तसेच, गोलंदाजी करताना ९९ डावात २.९८च्या इकॉनॉमी रेटने २१५ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, त्याने २२१ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये फलंदाजी करताना त्याने ३७.७३च्या सरासरीने ६७५५ धावा केल्या आहेत. तसेच, वनडेत गोलंदाजी करताना त्याने ४.४४च्या इकॉनॉमी रेटने २८५ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त ९६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात त्याने २२.४४च्या सरासरीने १९०८ धावांचा पाऊस पाडला आहे. तसेच, गोलंदाजी करताना ६.६७च्या इकॉनॉमी रेटने ११९ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पोराची बातच न्यारी! थेट चालू सामन्यातच स्कूटर घेऊन घुसला मैदानात, पाहायला मिळाला विचित्र नजारा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विराटचा पत्ता होणार कट? निवडकर्ते करणार कोहलीशी चर्चा
क्रिकेटर नसता, तर ‘हे’ काम करून देशाची सेवा केली असती; दिल्लीच्या ‘दबंग’ खेळाडूचा मोठा खुलासा