---Advertisement---

भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या खेळाडूच्या आई-वडीलांचा अपघात!

On: बुधवार, मे 9, 2018 11:41 AM
---Advertisement---

मुंबई । भारतीय कसोटी संघात काल निवड झालेल्या शार्दुल ठाकूरचे आई-वडील अपघातात जखमी झाले आहेत. हा अपघात काल पालघर जवळ झाला असून त्याचे आई-वडील लग्न समारंभातून परतत होते

शार्दुलच्या वडिलांचे नाव नरेंद्र तर आईचे हंसा ठाकूर ठाकूर असुन त्यांच्या दुचाकीला हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याच्या आई-वडीलांना रूग्णालयात नेले.

Read-एकाच वेळी विराट दोन सामने कसे खेळणार?

ठाकूर दाम्पत्याची दुचाकी घसरुन हा अपधघात झाल्याचे बोलले जात आहे. ठाकूर कुटुंबीय हे पालघरमधील माहीम येथे रहातात.

सध्या शार्दुल ठाकूर भारतीय वनडे संघाचा सदस्य असुन त्याची कालच भारतीय कसोटी संघातही निवड झाली आहे. हा सामना १४ जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे.

तसेच हा खेळाडू सध्या आयपीएलमध्ये कॅप्टन कुल एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचाही सदस्य आहे.

शार्दुल भारताकडून आजपर्यंत ३ वनडे आणि ७ टी२० सामने खेळला आहे.

Read-इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment