इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील साखळी सामने संपले असून स्पर्धा प्लेऑफच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. यातील पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना पार पडला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाविरुद्ध भिडण्यासाठी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात चुरस पाहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेत पंजाब किंग्स संघाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन याने शानदार प्रदर्शन केले. मात्र, त्याच्या संघाला प्लेऑफसाठी क्वालिफाय करता आले नाही. धवन आता त्याच्या घरी पोहोचला आहे. तो घरी पोहोचताच त्याच्या वडिलांनी त्याला बरे-वाईट ऐकवत चांगलाच चोप दिला आणि जमिनीवर पाडत लाथाही मारल्या.
शिखर धवन (Shikhar Dhawan) याने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांसोबतच आजी-माजी खेळाडूही प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत.
धवनचा सोशल मीडियावरील वावर इतर खेळाडूंच्या तुलनेत जरा जास्तच आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. कारण, धवन नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. यावर तो आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. धवनने शेअर केलेला हा मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्याचे संपूर्ण कुटुंब वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. एका व्यक्तीने पोलिसांची भूमिकाही साकारली आहे. व्हिडिओत त्याच्या वडिलांनी काळा चष्मा घातला आहे. हा व्हिडिओ शेअर करत धवनने कॅप्शनमध्ये “नॉकआऊटसाठी क्वालिफाय न झाल्यामुळे वडिलांनी मलाच नॉकआऊट केले,” असे लिहिले आहे.
View this post on Instagram
शिखर धवन याच्या या व्हिडिओवर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही कमेंट केली. त्याने लिहिले की, “तुझे वडील तुझ्यापेक्षा मोठे कलाकार निघाले. क्या बात है.”
धवनची आयपीएल २०२२मधील कामगिरी
धवनने आयपीएल २०२२मध्ये तुफान फटकेबाजी केली. त्याने १४ सामन्यात फलंदाजी करताना ३८.३३च्या सरासरीने ४६० धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ३ अर्धशतकांचीही बरसात केली. विशेष म्हणजे, आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानी आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुड्डाचा झेल पकडण्याच्या नादात पोलीस अधिकारी जखमी; व्हिडिओ जोरदार व्हायरल
लखनऊने गमावली पदार्पणातील IPL हंगाम गाजवण्याची संधी, ‘या’ ३ चुकांमुळे गमावला Eliminator सामना
अनसोल्ड खेळाडू ते मॅच विनर, लखनऊविरुद्ध शतक ठोकणारा आरसीबीचा रजत पाटीदार; वाचा त्याच्याबद्दल