भारतीय क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्याशी संबंधित ही बातमी आहे. धवनच्या खांद्यावर एकापाठोपाठ एक अशा अनेक जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. नुकतेच त्याला नोव्हेंबर महिन्यातील न्यूझीलंड दौऱ्यावरील भारताच्या वनडे संघाचा कर्णधार बनवले आहे. यानंतर आता जगातील सर्वात मोठी टी20 लीग असणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023 या हंगामासाठी मोठ्या संघाने त्याला आपला कर्णधार बनवले आहे.
कोणत्या संघाचा कर्णधार बनला धवन?
इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) या स्पर्धेच्या 2023 या हंगामात पंजाब किंग्स फ्रँचायझीने नेतृत्वाची जबाबदारी शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या खांद्यावर सोपवली आहे. धवनने मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याची जागा घेतली आहे.
बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) फ्रँचायझीच्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अगरवाल या वर्षीच्या सुरुवातीला आपल्या संघाला आयपीएलच्या प्लेऑफपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला या पदावरून हटवणे निश्चित असल्याचे बोलले जात होते. केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स संघात सामील झाल्यानंतर मयंककडे आयपीएल 2022च्या हंगामाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली होती. संघ त्याच्या नेतृत्वात चांगला प्रदर्शन करू शकला नव्हता. तसेच, मयंकही 16.33च्या सरासरीने 196 धावाच करू शकला होता.
https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1587837068562305024
पंजाब किंग्स फ्रँचायझी मागील वर्षीच धवनला कर्णधार बनवण्याच्या विचारात होती. मात्र, त्यांनी मयंक अगरवालला संधी देत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या सूत्रांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “बोर्डाने शिखर धवनला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आयपीएलमध्ये एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून चांगला अनुभव आहे. तसेच, त्याने संघासाठी पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली होती.”
शिखर धवनची आयपीएल 2022मधील कामगिरी
शिखर धवन याने आयपीएल 2022मध्ये 14 सामन्यातील 14 डावात फलंदाजी करताना 38.33च्या सरासरीने 460 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 3 अर्धशतकेही झळकावली. यादरम्यान 88 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानसाठी दुष्काळात तेरावा महिना, ‘हा’ स्फोटक फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातून बाहेर
हाय प्रेशर सामन्यात सुटले कोहलीचे नियंत्रण, धावबाद झाल्यामुळे कार्तिक अन् विराटमध्ये बाचाबाची!