पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघ पिछाडीवर पडला आहे. गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) ब्रायन लारा स्टेडिअम येथे पार पडलेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने भारतीय संघाचा 4 धावांनी नजीकचा पराभव केला. असे असले, तरीही या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मा याने आपल्या विस्फोटक प्रदर्शनाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. तिलकने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला. यामुळे सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या यानेही त्याचे कौतुक केले. याव्यतिरिक्त सामन्यानंतर तिलकला आणखी एक सरप्राईज मिळाले, ज्यात त्याने मुंबई इंडियन्स संघाचा सहकारी डेवाल्ड ब्रेविस याच्यासोबत संवाद साधला.
सामना संपल्यानंतर तिलक वर्मा (Tilak Varma) याचे दक्षिण आफ्रिका संघाचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याने व्हिडिओ मेसेजद्वारे (Dewald Brevis Video Message) खास अभिनंदन केले. त्याने म्हटले की, “मला पूर्ण आशा आहे की, तू तुझ्या पदार्पणाबद्दल खूपच उत्साहित होशील, पण मला माहिती नाही की, यासाठी तुझ्यापेक्षा जास्त मी उत्साही का आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणासाठी मी तुझे अभिनंदन करतो. हा तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासाठी खूप मोठा क्षण आहे.”
A special cross-continental friendship! 🇮🇳 🇿🇦
Tilak Varma 🤝 Dewald Brevis #TeamIndia | #WIvIND | @TilakV9 | @BrevisDewald pic.twitter.com/SLomVNjpCi
— BCCI (@BCCI) August 3, 2023
पुढे बोलताना ब्रेविस म्हणाला की, “मी हे समजू शकतो की, सध्या तुझ्या कुटुंबाच्या काय भावना असतील. तुझे स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि तुझ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या चेंडूवर माझ्या अंगावर काटा आला होता. मालिकेतील इतर सामन्यांसाठी तुला आणि तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा.”
व्हिडिओ पाहून तिलकही हैराण
तिलक वर्मा याने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हटले की, तो त्याचे प्रशिक्षक किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या संदेशाची आशा या व्हिडिओत करत होता. मात्र, ब्रेविसला पाहून तो स्वत: हैराण झाला. तिलक म्हणाला की, तो लवकरच ब्रेविसला व्हिडिओ कॉल (Dewald Brevis Video Call) करेल आणि त्याच्याशी संवाद साधेल.
पहिल्याच सामन्यात तिलकच्या 39 धावा
मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाकडून तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. या संधीचं सोनं करत त्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार मारत 39 धावांचा पाऊस पाडला. त्याने भारताकडून या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या. मात्र, भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. अशात दुसरा सामना 6 ऑगस्ट रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याद्वारे भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. (cricketer tilak varma surprised with special video message from his mumbai indians teammate dewald brevis see video)
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीजने मोडला भारताचा गर्व! 200व्या सामन्यात रोखला विजयरथ; काय होता 1, 50, 100 अन् 150व्या सामन्याचा निकाल?
पदार्पणात चमकला तिलक वर्मा! फिल्डिंग करताना पकडला अविश्वसनीय Catch, पाहून तुम्हीही कराल कौतुक