भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर खेळला जात आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचे दिल्ली हे जन्मठिकाण आहे. अशात त्याच्यासाठी दिल्ली कसोटी सामना खास आहे. मात्र, 5 दिवसाच्या सामन्यातील 2 दिवस खेळून झाले आहेत आणि तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया त्यांचा दुसरा डाव खेळत आहे. अशात हा सामना पुढील 2 दिवसात संपणार आहे. ऑस्ट्रेलिया त्यांंच्या दुसऱ्या डावात 12 षटकात एक विकेट गमावत 61 धावांवर खेळत आहे. तसेच, त्यांच्याकडे 62 धावांची आघाडीदेखील आहे.
अशात माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा हा अंतिम कसोटी सामना असू शकतो. कारण, बीसीसीआय रोटेशन पॉलिसी पाहिली, तर दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) 6 वर्षांनंतर एखादा कसोटी सामना खेळला जात आहे. त्यामुळे पुन्हा असे झाले, तर या मैदानावर 2029मध्ये एखादा कसोटी सामना खेळला जाईल. तोपर्यंत विराट 40 वर्षांचा होईल.
अरुण जेटली स्टेडिअमवर विराटची आकडेवारी
भारतीय धुरंधर विराटचे वय सध्या 34 वर्षे आहे. त्याने दिल्लीत आतापर्यंत 4 कसोटी सामन्यातील 7 डावात 73च्या सरासरीने 511 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 2 अर्धशतके ठोकली आहेत. यामध्ये 243 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. विशेष म्हणजे, भारतीय खेळाडू म्हणून ही त्याची सर्वोच्च धावसंख्यादेखील आहे.
विराट आतापर्यंत इथे एकही कसोटी गमावला नाहीये. 2 सामन्यात त्याने विजय मिळवला आहे, तर एक कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. अशात त्याला त्याचा विजयाची आकडेवारी कायम ठेवावी लागेल. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या या कसोटीतील तिसरा दिवस खूपच महत्त्वाचा असणार आहे.
A massive breakthrough for Australia!
Matthew Kuhnemann scalps Virat Kohli as his maiden Test wicket ☝️#WTC23 | #INDvAUS | 📝: https://t.co/HS93GIzcmq pic.twitter.com/OAHfdAlBeT
— ICC (@ICC) February 18, 2023
विराटची दिल्ली कसोटीतील खेळी
विराटने दिल्ली कसोटीत भारताच्या पहिल्या डावात एकूण 44 धावा केल्या आहेत. तो यादरम्यान पदार्पणवीर मॅथ्यू कुह्नेमन याच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. त्याच्या विकेटवरून मोठा वादही उपस्थित झाला. विराटची एकूण कसोटी आकडेवारी पाहिली, तर त्याने कसोटीत आतापर्यंत 106 सामन्यात 8175 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 27 शतके आणि 28 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची नाबाद 254 ही आतापर्यंतची सर्वोच्च कसोटी धावसंख्या आहे. (cricketer virat kohli may be last test in delhi match being played here after 6 years ind vs aus 2nd test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका ऑस्ट्रेलियनकडून शिकूनच ऑस्ट्रेलियाला चोपतोय अक्षर, स्वतः केला खुलासा
टी20 विश्वचषकात भारतीय संघाची पहिली हार! इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश, रिचा-स्मृतीची झुंज अपयशी