जगभरातील प्रतिष्ठित आणि मोठी लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेला ओळखले जाते. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून खेळाडूंचे नशीब एका रात्रीत चमकले आहे. याच जोरावर त्यांनी भारतीय संघापर्यंत मजल मारली. या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्या नावाचाही समावेश होतो. चहलला भारताकडून टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये नशीब आजमावण्याची संधी मिळाली. त्याने या दोन क्रिकेट प्रकारात विक्रमांचे मनोरेही रचले आहेत. मात्र, अजूनही युझवेंद्र चहल कसोटी क्रिकेट खेळू शकला नाहीये. नुकतेच स्वप्न सांगताना चहलने कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याविषयी भाष्य केले.
काय म्हणाला चहल?
भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचे एक स्वप्न अजूनही पूर्ण झाले नाहीये. त्याचे स्वप्न इतर कोणतेही नसून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचे आहे. खरं तर, टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या चहलला अद्याप एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळू शकली नाहीये. चहलला त्याच्या कसोटी पदार्पणाची खूपच प्रतीक्षा आहे. अशात त्याने भाष्य करत म्हटले की, तो अजूनही त्याच्या कसोटी पदार्पणाचे स्वप्न पाहतो. कसोटी क्रिकेट त्याच्या चेकलिस्टमध्ये सामील आहे.
चहल म्हणाला की, “आपल्या देशासाठी खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. कसोटीत पदार्पण करावे अशी माझी इच्छा आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मी खूप काही मिळवले आहे, पण कसोटी क्रिकेट अजूनही माझ्या चेकलिस्टमध्ये आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “माझ्या नावापुढे कसोटी क्रिकेटरचा टॅग लागावे, याचे स्वप्न मी पाहतो. मी घरगुती क्रिकेट आणि रणजीत आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून माझे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. आशा करतो की, लवकरच मला भारतीय कसोटी संघाकडून खेळण्याची संधी मिळेल.”
चहलची कारकीर्द
युझवेंद्र चहल याने भारतीय संघाकडून 72 वनडे आणि 75 टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 27.13च्या सरासरीने आणि 5.26च्या इकॉनॉमी रेटने 121 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, टी20त त्याने 24.68च्या सरासरीने आणि 18.1च्या इकॉनॉमी रेटने 91 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 33 सामन्यांतील 51 डावात 3.13च्या इकॉनॉमी रेटने 87 विकेट्स घेतल्या आहेत. (cricketer yuzvendra chahal dreams about making team india test debut said this)
महत्वाच्या बातम्या-
‘आता सर्वांनी काळजी घ्या, मला कालीन भैय्या…’, IPL गाजवणाऱ्या रिंकूच्या ‘त्या’ पोस्टने इंटरनेटवर खळबळ
श्रीमंत हार्दिक! वहिनीने बूट चोरीसाठी मागितली मोठी रक्कम, पठ्ठ्याने झटक्यात ट्रान्सफर केली पाच पट रक्कम