१३ मार्च रोजी युएईमध्ये पार पडलेल्या १०पीएल क्रिकेट स्पर्धेहून मायदेशी परतलेल्या भारताच्या २५ खेळाडूंची कोरोना टेस्ट झाली. परंतु ही टेस्ट झाल्यावर क्वॉरन्टाइनमधून या खेळाडूंनी पळ काढल्याचे वृत्त आहे.
ही टेस्ट मुंबईमधील एका हाॅस्टिपटमध्ये झाली. यानंतर खेळाडूंना क्वॉरन्टाइनमध्ये पाठविण्यात आले. परंतु त्यांनी येथून सुरक्षा रक्षकांना फसवुन पळ काढल्याचे वृत्त आहे.
याबाबतचे पहिले वृत्त हे गल्फ न्यूजने दिले आहे. यात त्यांनी हे ११ खेळाडू पळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे खेळाडू दुबई येथे क्रिकेट मालिका खेळण्यासाठी गेले होते.
असे असले तरी गल्फ न्यूजशी नंतर बोलताना भारतीय संघाचा कर्णधार अंकुर सिंगने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
गल्फ न्यूजशी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार अंकुर सिंग म्हणाला, “आम्ही तेथुन पळून आलो ही बातमी खोटी आहे. आम्हाला मुंबई विमानतळावर सर्व क्लेअरन्स मिळाल्यावरच आम्ही बाहेर पडलो होतो. दुबईवरुन आल्यावर आम्ही मुंबई विमानतळाच्या हाॅस्टिपटलमध्ये गेलो होतो. तेथे आमची कोरोना टेस्ट झाल्यावरच आम्ही घरी परतलो आहे. ”
“जेव्हा आम्ही घरी पोहचलो तेव्हा आम्हाला पुन्हा हाॅस्पिटलमध्ये येण्यासाठी सांगतिले. आम्ही सांगतिल्याप्रमाणेच केले. आम्ही कुठेही पळून गेलो नाही. तसेच आम्हाला क्वॉरन्टाइनमध्ये रहाण्यासाठी सांगतिले गेले नाही. आम्हाला तेव्हा आमच्या टेस्टचे निकाल सांगतिले जातील असे सांगतिले गेले.” असेही अंकुर यावेळी म्हणाला.
याबद्दल बोलताना १०पीएल क्रिकेट मालिकेचे आयोजक अब्दुल लतीफ खान म्हणाले, कोणताही क्रिकेटर पळाला नाही. हे रायगडमधील मोठे खेळाडू आहेत. यांना सर्वजण चांगले ओळखतात. ते पळून जाणार तरी कुठे? जर टेस्टचा रिपोर्टचं मिळाला नाही तर ते पळणार तरी कसे?
या स्पर्धेत रायगडमधील २५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा टेनिस बाॅल खेळणाऱ्या व पहाणाऱ्यांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे.
ट्रेडिंग घडामोडी-
–बरोबर ८ वर्षापुर्वी याच दिवशी सचिनने घेतला होता मोठा निर्णय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–योग्य ठिकाणी गाडी पार्क न केल्यामुळे धोनीची पत्नी नाराज; पहा व्हिडिओ
–रणवीर सिंग नकोच; फक्त आणि फक्त हाच अभिनेता करु शकतो माझी भूमिका
–टी20 क्रिकेट विश्वचषकाच्या आयोजनाबद्दलची सर्वात मोठी बातमी