---Advertisement---

‘हे’ आहेत जगातील सर्वात जास्त मानधन घेणारे क्रिकेटपटू; पहिल्या पाच जणांत नाही विराट

Jos Buttler and Virat Kohli
---Advertisement---

क्रिकेट हा खेळ रातोरात खेळाडूंना मालामाल करून टाकतो. आयपीएल आणि अन्य व्यावसायिक टी२० लीगमधून खेळाडूंना बरेचसे पैसे मिळत असतात. सोबतच उत्कृष्ट कामगिरी केल्यावर विविध ब्रँड त्यांना आपला ब्रँड ॲम्बेसिडर बनवून जाहिराती करून घेण्यासाठी पैसे देतात. या व्यतिरिक्त प्रत्येक क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंशी वार्षिक करार करते. आज आपण अशाच प्रकारे केवळ क्रिकेट बोर्ड देत असलेल्या मानधनाला प्रमाण मानून जगभरातील सर्वात महागडे क्रिकेटपटू जाणून घेणार आहोत.

इंग्लंडचे खेळाडू सर्वाधिक श्रीमंत
इतर मार्गाने येणाऱ्या पैशांच्या आधारे भारतीय खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू असले तरी, केवळ क्रिकेट बोर्ड देत असलेल्या रकमेनुसार इंग्लंडचे खेळाडू सर्वाधिक श्रीमंत आहेत. इंग्लंड बोर्डाने करारबद्ध केलेल्यापैकी जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जो रूट व ख्रिस वोक्स जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटपटू आहेत. या पाच जणांना वार्षिक ८७०,००० पाउंड म्हणजेच भारतीय रुपयात ९ कोटी इतकी घसघशीत रक्कम मिळते.

इंग्लंडपाठोपाठ भारतीय क्रिकेटपटूंचा लागतो क्रमांक
फक्त बोर्डाच्या पगारावर श्रीमंत मानल्या जाणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह यांचा क्रमांक लागतो. या तिघांना देखील बीसीसीआयकडून वार्षिक ७ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम दिली जाते. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारात या तिघांना ए + श्रेणीत स्थान दिले होते.

नवव्या क्रमांकावर ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
क्रिकेट बोर्डाने दिलेल्या मानधना नुसार ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच नवव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड त्याला वर्षाकाठी ५ कोटी २५ लक्ष असे मानधन देते.

महत्त्वाच्या बातम्या –

झाला का घोटाळा? माईक हसीची ऑस्ट्रेलियाला जाण्याची वाट बसली अवघड होऊन

ब्रेकिंग! टीम इंडियाला मिळाला नवा प्रशिक्षक, रमेश पोवार झालेत भारतीय संघाचे नवे महागुरू

भारताकडून झालेल्या पराभावानंतर टिम पेनची सारवासारव, भारतीय संघालाच केले बदनाम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---