भारतातील कोरोना प्रकरणांमुळे मालदीवने मंगळवारी (११ एप्रिल) हवाई प्रवास करण्यास बंदी घातली आहे. केवळ भारतच नाही तर दक्षिण आशियाच्या देशांच्याही व्हिसावर बंदी घातली गेली. हा निर्बंध अनिश्चित काळासाठी लागू करण्यात आला आहे. मालदीवमधील या बंदीचा परिणाम क्रिकेटविश्वाशी संबंधित सेलिब्रिटींवरही होईल.
आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर काही परदेशी खेळाडू आधीच मायदेशी परतले आहेत. तर, बरेच खेळाडू मालदीवमध्ये राहिले आहेत. येथून ते ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला जातील. मात्र, चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक माईक हसीला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो मालदीवला जाऊ शकला नाही, त्यामुळे भारतातून मालदीवला जाणारी विमानसेवा थांबविल्यानंतर हसीला पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये कसे जायचे? हा प्रश्न सतावत आहे.
कोरोना पॉझिटिव आहे हसी
आयपीएल दरम्यान हसीची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. त्यानंतर त्याला चेन्नई येथे हलविण्यात आले. तेथे न्यूझीलंडचा टिम सिफर्ट याच्या सोबत तो उपचार घेत आहे. मालदीवहून तो आपल्या सहकाऱ्यांसह ऑस्ट्रेलियाला परत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रथम मालदीवमध्ये गेले आणि त्यानंतर ते १४ दिवस क्वारंटाईन राहून ऑस्ट्रेलियाला परततील.
एक रिपोर्ट आला निगेटिव्ह
माईक हसीची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्यानंतर दुसरी चाचणीदेखील नकारात्मक यायला हवी. मात्र, ज्या पद्धतीने मालदीवने भारतीय विमानांवर बंदी घातली आहे. त्याप्रकारे, माईक हसीला मालदीवला जाणे आणि सहकारी खेळाडूंबरोबर ऑस्ट्रेलियाला उड्डाण घेणे अवघड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हसीची दुसरी चाचणी आज होणार आहे. त्याचा रिपोर्ट शुक्रवारी येईल. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विष्वनाथन म्हणाले की, माइक तंदुरुस्त होणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे, या क्षणी ते वेगाने बरा होत असून त्याची तब्येतही ठीक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! टीम इंडियाला मिळाला नवा प्रशिक्षक, रमेश पोवार झालेत भारतीय संघाचे नवे महागुरू
भारताकडून झालेल्या पराभावानंतर टिम पेनची सारवासारव, भारतीय संघालाच केले बदनाम
संवेदनशील ऑस्ट्रेलियन! ब्रेट ली आणि कमिन्ससह आणखी ११ खेळाडूंनी कोरोनाविरोधी लढाईसाठी केली मदत